Viral Video : स्वर्गात जाणारा रस्ता; महाकाय बर्फाच्छादित डोंगरातून निघणारी ही वाट नेमकी कुठे जाते?
Viral Video : या भुयाराच्या पलिकडे वेगळं विश्व? व्हायरल व्हिडीओमुळं हा खरंच स्वर्गाचा रस्ता आहे का? असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसत आहेत.
Viral Video Tunnel To Heaven : स्वर्ग आणि नरक हे दोन शब्द या न त्या कारणानं कायमच ऐकायला मिळाले आहेत. मुळातच 21 व्या शतकामध्ये या दोन्ही संकल्पना काल्पनिक असल्याचं म्हणत स्वर्ग आणि नरक प्रत्यक्षात कोणीच पाहिलं नाही हेसुद्धा तितकंच खरं. असं असलं तरीही सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहताच अनेक नेटकऱ्यांनी हा स्वर्गाचाच जायचा रस्ता असल्याचंही म्हटलं आहे.
पुराणकथा आणि अनेक दंतकथांमध्येही उल्लेख असल्यानुसार स्वर्ग प्रत्यक्षात खुप सुंदर असून, या जागेची भव्यता अवाक् करणारी आहे. म्हणूनच जेव्हाकेव्हा एखाद्या सुरेख ठिकाणी भेट देण्याचा आणि ते ठिकाण प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळते तेव्हा त्या ठिकाणाला स्वर्गाची उपमा दिली जाते. अशा या स्वर्गात जाणाऱ्या एका वाटेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये बर्फाच्छादित पर्वतामधील एका महाकाय भुयारातून एक मार्ग प्रकाशझोताच्या दिशेनं चालताना दिसतो. ही वाट जसजशी पुढे जाते तसतसा प्रकाश वाढत जातो आणि पाहता पाहता शेवटी लख्ख, डोळे दीपवणारा प्रकाश नजरेस पडतो. प्रत्यक्षात हा स्वर्गाकडे जाणारा रस्ता नसला तरीही त्याला तशी उपमा दिली जात आहे.
हेसुद्धा वाचा : काच, प्लास्टीक की स्टील? पिण्याच्या पाण्यासाठी कोणती बाटली योग्य?
उपलब्ध माहितीनुसार हा व्हिडीओ आईसलँडमधील बर्फाच्छादित ग्लेशिअरचा असून, त्यामध्ये तयार झालेल्या भुयारातून एक व्यक्ती पुढे जाताना दिसते. एखादी चमत्कारी जागा असावी, अगदी तसंच हे भुयार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. प्रत्यक्षात अशा एखाद्या ठिकाणी जाणं अनेकांना शक्य होत नसलं तरीही हा व्हिडीओ मात्र ही मंडळी वारंवार पाहून प्रत्येक वेळी भारावून जात आहेत.
बर्फाच्छादित प्रदेशात एका डोंगरात तयार झालेलं हे भुयार आणि हा कमाल व्हिडीओ नेटकऱ्यांना कमालीचा आवडला असून, तो अनेकांनीच शेअरही केला आहे. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ ज्या वेगानं व्हायरल होत आहे ते वाखाणण्याजोगं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आणि ते भुयार पाहून काय वाटतं? आहे की नाही, ही स्वर्गाची वाट?