Viral Video: आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध असो की तरुण, आजकाल प्रत्येकाला फोनचे व्यसन लागले आहे. पण हे व्यसन मुलांसाठी योग्य नाही. आमच्या काळात मोबाईल नव्हता म्हणून चांगले शिक्षण करु शकलो, असे अनेकजण म्हणताना आपण पाहतो. हे खरंच आहे. कारण सध्या मुलांना लहानपणापासूनच हातात मोबाईल मिळतो. आणि कालांतराने त्यांना त्याचे व्यसन जडते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांनी जास्त फोन वापरल्यास त्याचा मानसिक विकास आणि डोळ्यांवर परिणाम होतो. आणि यामुळेच पालकांना मुलांवर लक्ष ठेवावे लागते. मुलांना फोनपासून दूर ठेवावे लागते. पण आजची मुलंही कमी नाहीत. तो नेहमी त्याच्या पालकांच्या 2 पावले पुढे असतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला चकमा देऊन फोनचा वापर करताना दिसत आहे. 


मुलांने आईला दिला चकमा



सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक लहान मूल अभ्यासासाठी बसलेले दिसत आहे. पण ते मूल पुस्तक वाचतंय असं तुम्हाला वाटेल. पण ते तसं काहीच करत नाहीय. उलट  पुस्तक समोर ठेवून मोबाईल पाहतोय. त्यावर त्याने दोरीने मोबाईल बांधून ठेवलाय. त्याचे सारे लक्ष मोबाईलमध्ये आहे. त्याने फोन दोरीने अशा प्रकारे बांधलेले आहे की दरवाजा उघडताच मोबाईल वरच्या कपड्याच्या मागे लपतो. 


मुलगा अभ्यास करतो की नाही हे पाहण्यासाठी त्याची आई रुममध्ये आली. तिने रुमचा दरवाजा उघडताच मोबाईल वर कापडामागे गेला. आणि आईला पाहून मुलगा वाचण्याचे नाटक करु लागला. मुलगा अभ्यास करतोय हे पाहून आई देखील आनंदीत झाली. तिने मुलाच्या डोक्यावर हात ठेवून मुलाला शाबासकी दिली आहे. 


व्हिडिओला 3.7M व्ह्यू 


हा व्हिडिओ मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @Figen नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 
कॅप्शनमध्ये मुलाला स्मार्ट म्हटले आहे. हे लिहित असताना हा व्हिडिओ 3 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. आणि 60 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. मुलाची हुशारी पाहिल्यानंतर लोकांनी कमेंटमध्ये त्याचे खूप कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले - स्मार्ट मुलगा.  बेटा, खूप अभ्यास कर, असे  दुसऱ्या युजरने लिहिले आहे.