Viral Video : Wedding Gown मध्ये समोर आल्या 6 नवऱ्या; यातही आई ओळखून दाखवा तर मानली तुमची नजर
Mother Daughter Viral Video : आई कुठली आणि मुलगी कुठली काय समजत नाही. व्हिडीओमधील 6 ही तरुणींचा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. लग्नाचा पोशाख परिधान करुन एक आई आपल्या 5 मुलींसोबत मोठ्या उत्साहाने रस्त्यावरुन निघाली आहे.
Mother Daughter Viral Video : सोशल मीडियावर 6 मुलींच्या व्हिडीओने सगळ्या बिचकळ्यात पाडले आहे. 5 मुलींसह एक आई लग्नाचा पोशाख घालून रस्त्याने निघाल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून यात आई कुठली हा प्रश्न पडतो. दोन तरुणींच्या कुशीत तर तान्हुलेदेखील दिसत आहेत. लग्नाचा पोषाख आपण कोणाचं लग्न किंवा अतिशय जवळचं काही समारंभ असेल तरच परिधान करतो. पण या 6 जणी नेमक्या निघाल्या कुठे?
Wedding Gown मध्ये समोर आल्या 6 नवऱ्या
तुम्हालाही प्रश्न पडला ना, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण? हा व्हिडीओ आहे अमेरिकेतील टेक्सासमधील अॅलेक्सिस ह्यूस्टन हिच्या कुटुंबियाचा आहे. हा व्हिडीओ अॅलेक्सिसने शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आम्ही ठरवलं आही की, आमच्या लग्नातील वेशभूषा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी नक्कीच घालायचे. ठरल्याप्रमाणे लग्नाचे पोषाख घालून 5 बहिणी आईसोबत जेवायला बाहेर गेलो. रस्त्यावरुन जाताना आणि नंतर रेस्टारंटमध्ये आम्हाला मजेदार अनुभव आले.
Wedding Gown 6 नवऱ्या कुठे निघाल्यात?
जेव्हा आम्ही रस्त्याने जात होतो सगळे जण आमच्याकडे आश्चर्याने पाहत होते. मजेशीर गोष्ट म्हणजे 5 जणींपैकी एका बहिणीचं लग्न झालं नाही. तर आईचा Wedding Gown हरवला होता. आमच्या या कल्पनेसाठी त्या दोघींनीही नवीन Wedding Gown घेतला.
यातही आई ओळखून दाखवा तर मानली तुमची नजर
तुम्हाला या 6 जणींमधील आई ओळखता येते आहे का? आईचं नाव टेरी बोनी आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तिला 11 मुलं आहे. 5 मुलं आणि 6 मुली आहेत. या कल्पनेनंतर टेरी म्हणाली की, मुलीच्या या कल्पनेने मारी भारावली. मला खूप आनंद झाला. लोक आम्हाला भेटायला येत होती. एकेकाळी ती पती आणि मुलींसोबत बाहेर जायची. आज मी मुलं आणि सुनां नातूनात्यांसह बाहेर फिरायला जायचे. (viral video mother and six daughters wearing wedding dress go to dinner trending video trend on google)
इंस्टाग्रामवरील या व्हिडीओला नेटकऱ्यांनी खूप पसंती दिली आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 40 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर यूजर्स प्रतिक्रिया देत आहे. आई आणि मुलीचं नातं खूप खास असतं. मुलींना आई जितकी समजू शकते तितकं क्वचितच कोणी समजू शकतं. एका यूजर्सने लिहिलं आहे की, मुलगी, सून आणि आई खूप छान कल्पना आहे.