Viral Video: धाडस आणि मूर्खपणा यात नेमका काय फरक आहे तो ओळखता आला की नाही की मग काय होतं हे दाखवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. 29 जुलैला 42 वर्षीय रिसर्चर गैरोन मैया आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस्को मैया यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. विमान दुर्घटनेत दोघांनीही आपला जीव गमावला. एका जंगलात त्यांच्या ट्विन इंजिन असणारं बीचक्राफ्ट बॅरन 58 दुर्घटनाग्रस्त झालं. 


11 वर्षीय मुलाच्या हातात दिलं विमानाचं नियंत्रण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होण्याआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दुर्घटनेमागील कारण लक्षात येत आहे. याचं कारण गैरोन विमान हवेत असतानाच मद्यपान करु लागला होता. इतकंच नाही तर त्याने विमानाचं नियंत्रण आपल्या 11 वर्षीय मुलाकडे सोपवलं होतं. Express.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ कथितपणे दुर्घटनेत पिता-पुत्राचा मृत्यू होण्याआधी काही क्षणांपूर्वी शूट करण्याता आला होता. 


दुर्घटनेनंतर याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खरंच दुर्घटनेच्या आधीचा आहे का? यासंबंधी अधिकारी तपा, करत आहेत. व्हिडीओत गैरोन बिअर पिताना आपल्या मुलाला विमानाचं उड्डाण करण्यासंबंधी आणि नियंत्रित करण्यासंबंधी सूचना देत असल्याचं दिसत आहे. 


गैरोनने हा व्हिडीओ नेमका कधी शूट केला आहे याचा तपास अधिकारी करत आहेत. दरम्यान, या व्हिडीओतून गैरोन आपल्या आणि मुलाच्या सुरक्षेबाबात फारच बेफिकिर होता हे मात्र स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, विमान दुर्घटनाग्रस्त झालं तेव्हा मुलगाच उड्डाण करत होता का? याचा तपास सुरु आहे. 



फार्म हाऊसमधून केलं होतं उड्डाण


ब्राझीलच्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गैरोनने नोवा कॉन्क्विस्टामधील रोंडोनिया शहरातील आपल्या फार्म हाऊसमधून उड्डाण केलं होतं. यानंतर इंधन भरण्यासाठी विल्हेनामधील विमानतळावर थांबले होते. गैरोन आपल्या मुलाला आईकडे सोडण्यास चालला होता, जिथे त्याचं शिक्षण सुरु होतं. 


पती आणि मुलाच्या मृत्यूचं वृत्त ऐकून आईची आत्महत्या


पण दुर्दैवाने घऱी पोहोचण्याआधीच पिता आणि पुत्राला आपला जीव गमवावा लागला. मुलगा आणि पतीचा मृत्यू झाल्याने एना प्रिडोनिकवर आभाळ कोसळलं होतं. 1 ऑगस्टला दोघांना दफन केल्यानंतर काही तासातच तिने आत्महत्या केली. 


ब्राझीलच्या कायद्यानुसार, केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांनी हायस्कूल पूर्ण केले आहे आणि राष्ट्रीय नागरी उड्डयन एजन्सीमध्ये नोंदणीकृत आहे, त्यांनाच विमान उडवण्याची परवानगी आहे.