हवेतून उडत आलं विमान आणि सरळ उतरलं हायवेवर... धोकादायक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
बऱ्याचदा सोशल मीडियावर आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळतं जे खरोखरंच धक्कादायक असतं. सध्या समोर आलेला व्हिडीओ हा असाच काहीसा आहे.
मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्या आवडी निवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे कन्टेन्ट पाहायला मिळतात. बऱ्याचदा येथे आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळतं जे खरोखरंच धक्कादायक असतात. सध्या समोर आलेला व्हिडीओ हा असाच काहीसा आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील महामार्गावर एका लहान विमानानं धोकादायक लँडिंग केलं आणि आग लागण्यापूर्वी त्याने ट्रकला धडक दिली. सिंगल-इंजिन असलेल्या सेसना विमानाने मंगळवारी दुपारी कॅलिफोर्नियामधील 91 फ्रीवेवर आपत्कालीन लँडिंग केलं. व्हायरल होत असलेल्या धक्कादायक फुटेजमध्ये विमानाचा एक पंख रस्त्यावरून जात असलेल्या पिकअप ट्रकवर आदळण्यापूर्वी आकाशातून खाली पडताना दिसत आहे.
यादरम्यान विमानाचे पंख उडून गेले. यानंतर, व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, जेव्हा विमान धडकले तेव्हा रस्त्यावर आग लागली आणि आगीच्या ज्वालांमध्ये काहीतरी भयंकर घडल्याचे दिसत आहे.
हायवेवर विमान कोसळले तेव्हा दाट काळा धूर निघताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल (CHP) ने सांगितले की, सुदैवाने पायलट आणि प्रवासी दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहेत.
तीन जणांसह विमान हा विमान एक ट्रकलाही धडकलं. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पायलट अँड्र्यूचो यांनी सांगितले की, त्याने जवळच्या कोरोना म्युनिसिपल विमानतळावरून दिवसभरात छोट्या प्रवासासाठी उड्डाण केले होते. परंतु अचानक विमानाची पावर संपली, ज्यामुळे त्याला महामार्गावर कुठेतरी जागा शोधावी लागली, जेणे करुन त्याला लॅडिंग करता येईल.
सीएचपी कॅप्टन लेव्ही मिलर यांनी सांगितले, 'आम्ही खूप भाग्यवान आहोत की, ट्राफीक जास्त नव्हती, ज्यामुळे पायलटला विमान लँड करता आले. पायलटने चांगले लँडिंग नेव्हिगेशन केले. नाही तर याचे परिणाम खूपच भयानक झाले असते.'