`नरेंद्र मोदी या दडपशाहीतून आमची सुटका करा`, POK नागरिकाची विनंती; व्हिडिओ व्हायरल
ही व्यक्ती सर्व लोकांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे मदत मागताना दिसत आहे.
मुंबई : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील काही लोकं पाकिस्तान सरकारच्या वागणूकीमुळे खुश नाहीत आणि त्यांना पुन्हा एकदा भारतात यायचं असल्याच्या अनेक घटनांबद्दल बोललं जातं होतं. मात्र याच्याशी संबंधीत एक व्हिडीओ आता समोर आला आहे. जो पाहून तुमची खात्री पटेल की, तेथील नागरिकांना पाकिस्तानी लोकं आणि पोलिसांकडून कशा पद्धतीने त्रास दिला जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती ही पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील आहे आणि ती व्यक्तीला भारत सरकारला, त्याला मदत करण्याची विनंती करत आहे आणि या लोकांना धडा शिकवण्याचेही ते पंतप्रधान मोदी यांना आवाहन करत आहे.
सोशल मीडियावर व्हायर होणाऱ्या व्हिडीओमधील ही व्यक्ती सर्व लोकांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे मदत मागताना दिसत आहे. रिपोर्टनुसार हा व्हिडीओ पाकव्याप्त काश्मीरमधील आहे आणि हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव मलिक वसीम असे आहे.
या व्यक्ती व्हिडीओमध्ये असे म्हणत आहे की, "येथे असलेली मालमत्ता भारताची आणि शीखांची आहे. त्याच वेळी, तो म्हणतो की त्यांच्यावर पोलिस अत्याचार करत आहेत आणि त्यांच्या लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला इतक्या थंडीत जबरदस्तीने घराबाहेर काढत आहे."
या व्हिडीओमधील व्यक्ती म्हणजे मलिक वसीम म्हणत आहे की, "पोलिसांनी आमचे घर सील केले आहे. मी मुझफ्फराबादच्या आयुक्तांना आमचे घर आमच्या ताब्यात देण्यासाठी विनंत करतो. तुम्ही माझी मुलं रस्त्यावर पाहू शकता. मला काही झाले तर त्याला आयुक्त आणि तहसीलदार जबाबदार असतील. तुम्ही माझे घर उघडावे, अन्यथा मला भारत सरकारची मदत घ्यावी लागेल, मी पंतप्रधान मोदींना यांना धडा शिकवण्याचे आवाहन करतो."
पोलिसांनी हजारो कुटुंबांची घरे ताब्यात घेतली आहेत. ही भारताची मालमत्ता आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हीच या आणि ही मालमत्ता ताब्यात घ्या. आमची अत्याचारांपासून मुक्तता करा; असे आवाहन वसीमने पंतप्रधान मोदी यांन केलं आहे.
भारताने मंगळवारी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला घेरले आहे. तेव्हा भारताने म्हटले की, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार अजूनही पाकिस्तानात पंचतारांकित पाहुणचार घेत आहे. कदाचित पाकिस्तानमध्ये लपलेल्या दाऊद इब्राहिमबद्दल बोलताना भारताने असे म्हटले असावे.
'ग्लोबल काउंटर-टेररिझम कौन्सिल' द्वारे आयोजित 'आंतरराष्ट्रीय दहशतवाद 2022' या परिषदेत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित गुन्हेगारी यांच्यातील संबंध ओळखून त्यांना कठोरपणे हाताळले पाहिजे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद इब्राहिमची आपल्या भूमीवर उपस्थिती असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर पाकिस्तान सरकारने 88 प्रतिबंधित दहशतवादी गट आणि त्यांच्या हस्तकांवर निर्बंध जाहीर केले होते. या यादीत अनेक अंडरवर्ल्ड डॉनचेही नाव होते.