तुर्कीमध्ये आकाशात UFO दिसल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. तुर्कीमध्ये जवळपास तासभर आकाशात ही लाल रंगाची प्रतिमा दिसत असल्याने चर्चांना उधाण आलं होतं. अनेकांनी मोबाइलमध्ये हे दृश्य कैद केलं असून सोशल मीडियावर शेअर केलं आहे. वर्तुळाकार प्रतिमेच्या मधोमध मोठं छिद्र असल्याने हे UFO च आहे असा अनेकांचा दावा होता. मात्र हे ढग असून त्याला lenticular cloud असं संबोधलं जात असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुर्की आज एक असामान्य पहाट अनुभवायला मिळाली. #UFO lenticular/spying foehn clouds नावाच्या दुर्मिळ नैसर्गिक घटनेचं हे फुटेज," असं ट्वीट एका युजरने केलं असून सोबत फोटो आणि व्हिडीओही शेअर केले आहे. यामध्ये हे UFO च्या आकाराचा ढग आकाशात दिसत आहे. 


काही क्षणातच हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी हे ढग UFO सारखे दिसत असल्याचा दावा केला. मात्र तुर्कीच्या हवामान विभागाने तात्काळ स्पष्टीकरण देत ही दुर्मिळ घटना म्हणजे 'lenticular cloud' असल्याचं स्पष्ट केलं. 



द गार्डियननुसार, लेंटिक्युलर ढग वक्र, उडत्या बशीसारखे दिसण्यासाठी ओळखले जातात. ते सहसा 2000 ते 5000 मीटरच्या उंचीवर आढळतात.


Lenticular Cloud म्हणजे काय ?


फॉक्स न्यूजनुसार, जेव्हा हवा स्थिर आणि आर्द्र असते तेव्हा लेंटिक्युलर ढग टेकड्या आणि पर्वतांवर जोरदार वाऱ्याच्या चढउतारांमुळे तयार होतात. ते बहुतेकदा हिवाळ्यात तयार होतात, परंतु तरीही वर्षाच्या इतर वेळी ते पाहणे शक्य आहे. या प्रकारचे ढग पुढील दिवसात पर्जन्यवृष्टीचे संकेत असू शकतात. तसंच येणाऱ्या वादळाचीही शक्यता वर्तवतात.