Trending Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ट्वीटरवर एका थरकाप उडविणाऱ्या व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. इंटरनेटवर रस्ते, ट्रेन आणि विवाह अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सोमवारी राजस्थानमधील (Rajasthan) सुरतगढ (Suratgarh) मध्ये MiG 21 दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना ताजी असताना. एका विमानाला आग लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 


थरकाप उडविणारा व्हिडीओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका धावपट्टीवर विमान उभे आहे. विमानाला भीषण आग लागली असून आगीचे मोठे मोठे लोट उसळत आहे. धक्कादायक म्हणजे या विमानाच्या आत प्रवासी आहेत. तुम्ही नीट हा व्हिडीओ पाहिला तर विमानाच्या पुढच्या बाजूला असलेल्या दोन्ही बाजूच्या दारातून प्रवासी बाहेर निघण्यासाठी धडपड करत आहेत. ( viral video Plane fire passengers Rushing to save the lives shocking incident trending video on Social media) हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो...नीट हा व्हिडीओ पाहिलावर हे लक्षात विमानाच्या समोरील आपातकालीन दरवाज्यातून प्रवासी जीव वाचवत बाहेर पडत आहे. विमानाचे दोन्ही बाजूचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून प्रवासी बाहेर पडताना दिसत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आहे. त्यादरम्यान अचानक या विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. धगधगत्या ज्वालेतून प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी धावत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. 



हा व्हिडीओ ट्वीटरवर @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेला आहे. ही घटना कुठली आणि कधीची आहे याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही. मात्र मृत्यूच्या दाढीतून जीव वाचवितानाचा प्रवासांचा हा थरार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


थरकाप उडविणारा व्हिडीओ 


हा व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकतो. तुम्ही पाहू शकता आगीच्या भक्ष्यस्थानी दिसत आहे.  धुराचे उंच उंच लोट दिसत होते. प्रवाशी आपला जीव वाचविण्यासाठी सैरभैर पळताना दिसून येत आहे. एका मागोमाग एक प्रवाशी आपातकालीन दरवाज्यातून उतरताना दिसत आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 1.50 लाखांहून व्ह्यूज आले आहेत. 


सोशल मीडियावर भयानक आणि धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. काही व्हिडीओ तर इतके भीतीदायक असतात की माणसाची झोप उडून जाते.