इस्तानबूल : जगभरात लोकांना सेल्फीचा इतकी क्रेझ आहे की, लोकं त्यासाठी काही करतात. लोकं कुठेही फिरायला गेले की, सेल्फी घ्यायला वियरत नाही. एवढच काय तर एकादी नवीन गोष्ट जरी लोकांनी पाहिली तरी ते त्याच्या सोबत देखील लोकं आवर्जून फोटो काढतात. परंतु सेल्फीमुळे अनेक लोकांनी आपला जीव देखील गमावला आहे. प्रत्येक दिवसाला सेल्फीमुळे जीव गमावल्याची आपण अशी एक तरी बातमी ऐकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज देखील सोशल मीडियावर अशीच एक बातमी ट्रेंड करत आहे, ज्यामध्ये सेल्फी एका सोशल मीडिया स्टारला महागात पडली ज्यामुळे तिला तिचा जिव गमवावा लागला आहे


या सोशल मीडिया स्टारचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सेल्फी घेत असताना सोशल मीडियास्टार उंच इमारतीच्या टोकावरुन खाली पडते. कुब्रा डोगन नावाची ही सोशल मीडिया स्टार 160 फूट उंचावर सेल्फी घेताना उंचीवरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. या भितीदायक दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


डेली मेलच्या अहवालानुसार, 23 वर्षीय कुब्रा तुर्कस्तानच्या इस्तानबूल शहरात तिच्या चुलत बहिण हेलनच्या घरी गेली होती. जिथे दोघांनी अपार्टमेंटच्या टेरेसवर टिकटोक व्हिडीओ बनवण्याची योजना आखली. जसजसा दिवस संपायला येतो, तेव्हा सूर्यास्ताच्या वेळी हे लोकं व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात करतात. त्यानंतर हे दोघेही सेल्फी काढतात.


त्यानंतर कुब्रा आणि तिची चुलत बहिण टेरेसच्या दुसऱ्या भागात जाण्याचा निर्णय घेतात. तेव्हा टेरेसवर राखाडी रंगाचा एक भाग प्लास्टिकने झाकलेला होता. कुब्राने इथेच चूक केली.


कुब्राला वाटले की, प्लास्टिक टाकलेला हा भाग मजबूत असावा. पण अगदी उलट घडले. ती प्लास्टिकच्या त्या तुकड्यावर उभी राहताच तो तुटला आणि कुब्रा 9 मजल्यावरून सगळ खाली पडली. कुब्राच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आले आहेत.


ज्यात तिची चूलत बहीण व्हिडीओ काढत होती आणि वेगवेगळे पोज देत होती, त्याच वेळेला कुब्रा प्लास्टिकने झाकलेल्या छताच्या भागाजवळ बसलेली दिसत आहे. थोड्या वेळाने, एक मोठा आवाज आला. तेवढ्यात या चुलत बहीणीने पाहिले तर काय कुब्रा तेथे नव्हती. ती खाली पडली होती.


घाबरलेली तिच्या बहीणीने तातडीने आपत्कालीन सेवांना कॉल केला जातो. पण याचाही काही उपयोग नाही, कारण 160 फूट उंचीवरून खाली पडल्यानंतर कुब्राच्या जिवंत राहण्याची शक्यता नगण्य आहे.


आता या घटनेची चौकशी केली जात आहे. तिच्यासोबत असलेली कुब्राची बहीण नेबी डोगन कंत्राटदारावर आरोप करत आहे की, त्याने छताचा तो भाग प्लास्टिकच्या शीटने का झाकला. त्याच वेळी, दुःखात बुडलेले कुटुंबाने सांगितले की, आम्ही मुलींना फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी वरच्या मजल्यावर जाण्यास मनाई केली होती, परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही.



इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे, तर काही लोकांना या व्हिडीओला आणि या घटनेला एक उदाहरण म्हणून स्वीकारलं आहे. यावर लोकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.