मुंबई : एका न्यायाधीशाला एखाद्या गुन्हेगाराच्या प्रेमात पडलेले तुम्ही पाहिले आहे का? किंवा कधी ऐकले आहे का? हा प्रश्न ऐकायला थोडा विचित्र वाटत असला तरी ही एक खरी घटना आहे. जी दक्षिणी अर्जेंटीनामधील चबुत प्रांतात ( Chubut Province) घडली आहे. येथे एक जज महिला एका आरोपीच्या प्रेमात पडली आहे. या आरोपीवरती पोलिस अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या महिला जज आणि आरोपीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैद्याला किस करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता अर्जेंटिनाच्या या महिला न्यायाधीशाची चौकशी करण्यात येत आहे.


डेली मेलच्या वृत्तानुसार, 29 डिसेंबर रोजी जज मारिएल सुआरेझने तुरुंगात क्रिस्टियन 'माय' बुस्टोसला किस केले. याचा व्हिडीओ समोर आला होता. सुआरेझने आठवड्यापूर्वी बास्टोसला मिळालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला विरोध केला होता.


अहवालानुसार, 2009 मध्ये पोलिस अधिकारी लिएंड्रो रॉबर्ट्सच्या हत्येसाठी क्रिस्टियन बुस्टोसला जन्मठेपेची शिक्षा द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी एक पॅनल बोलवले गेले होते. सुआरेझ या जज पॅनेलचा एक भाग होती.


बास्टोसच्या जन्मठेपेच्या शिक्षेला विरोध करणाऱ्या पॅनेलवरील ती एकमेव न्यायाधीश होती. तिने बास्टोसला कमी शिक्षा देण्याची मागणी केली. पण तरीही उर्वरीत पॅनलच्या मतदान संख्येमुळे आरोपी बास्टोसला अधिकारी रॉबर्ट्सच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.


व्हिडीओमध्ये जज तुरुंगात आरोपीला किस घेताना दिसत आहेत. या दोघांना असं करताना पाहून अधिकाऱ्याने त्याच्या वरिष्ठांना याची माहिती दिली, परंतु सुआरेझने असं काही घडलंच नाही असे सांगितले.



हा व्हिडीओ जेव्हा जज सुआरेझला दाखवला गेला, तेव्हा याबद्दल बोलताना तिने सांगितले की, "माझा या माणसाशी कोणताही भावनिक संबंध नाही. मी त्याच्यावर एक पुस्तक लिहित आहे. आमचे नाते हे कामापुरते आहे. आम्ही त्यावेळेस बोलत होतो आणि आम्हाला वाटले की, आमचे बोलणे कोणीतरी ऐकत आहे. ज्यामुळे आम्ही हळू आवाजात एकमेकांच्या कानात बोलू लागलो."


या प्रकरणात सध्या पोलीस तपास करत आहेत, आद्याप या जज महिलेवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.