कानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, `पुढे जे घडलं..`; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर
Spider In Ear: कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे. या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
Spider In Ear: कोपऱ्यात कुठेतरी कोळ्याने घर बांधताना आपण पाहिले असेल. अचानक एखादा कोळी आसपास कुठे दिसला तर आपण त्याला तिथून हटवण्याचा किंवा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र हा आठ पायांचा प्राणी तुम्हाला त्रास देऊ शकतो? याचा कधी विचार केला आहे का? कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे. या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
अचानक कानात घुसला कोळी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचित्र आणि आश्चर्यकारक व्हिडिओ येत असतात. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ '@overtime' नावाच्या खात्यावरुन अपलोड करण्यात आला आहे. एक महिला कानात खाज सुटलीय म्हणून डॉक्टरकडे आली आहे. डॉक्टर तिच्या कानाची तपासणी करतात. त्यानंतर जे घडलं ते खूपच धक्कादायक होतं. कारण एक कोळी महिलेच्या कानात शिरल्याने ती वेदनेने ओरडत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आहे. ती महिला किंचाळत राहते आणि मग डॉक्टर तिच्या कानात द्रव पदार्थ टाकतात. यानंतर कोळी कानाच्या छिद्रातून अचानक बाहेर येतो आणि महिलेच्या मानेवर आणि तोंडावर रेंगाळू लागतो. हे पाहून लोक थक्क झाले. कोळ्याला आपल्या आजुबाजूला फिरकू देऊ नका असा सल्ला दिला जात आहे.
यूजर्सनी दिल्या प्रतिक्रिया
कानातून बाहेर येणाऱ्या कोळ्याचा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी युजर्सने दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, "प्रत्येक वेळी जेव्हा रात्री माझ्या कानात खाज येते तेव्हा मी काहीच करत नसे, पण या व्हिडिओने मला घाबरवले आहे.
दुसर्या यूजरने लिहिले की, 'या व्हिडीओमुळे माझ्या मनात भीती निर्माण झालीय. अत्यंत भयानक आणि चिंताजनक व्हिडिओ आहे. तर हा व्हिडीओ झोपण्यापूर्वी हे पाहणे आमच्यासाठी धक्कादायक आहे, असे तिसऱ्या यूजर्सने लिहिले आहे.