Viral Video : सध्या सगळीकडे वाढत्या तापमानामुळे वातवारण जास्तच तापलं आहे. त्यामुळे सामान्य माणूस उकाड्याने हैराण झालाय. यापासून वाचण्यासाठी एसी (AC), कुलर, पंखा, शीतपेये यांचा वापर करत आहे. मात्र मुक्या जनावरांना याचा त्रास सहनच करावा लागत आहे. मात्र अनेक जण भूतदया म्हणून या प्राण्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. या कडक उन्हात तहानलेल्या प्राण्याला पाणी देणे हे मोठं पुण्य मानले जाते. अनेकवेळा या पाण्यामुळे प्राण्याना जीवदान देखील मिळतं. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. मात्र एका कासवाच्या (turtle) मदतीसाठी गेलेल्या एका महिलेला धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कासवाच्या मदतीसाठी गेलेल्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका महिलेला तहानलेल्या कासवाला पाणी द्यायचे होते. कशीतरी प्रेमाने ती कासवाला स्वतःच्या बाटलीतून पाणी देत ​​होती. पाणी पाहून कासवही पुढे सरकले आणि त्याने पाणी पिण्यास सुरुवात केली. पण त्यानंतर जे काही झाले ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.


@StrangestMedia या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कासवाला पाणी देताना दिसत आहे. सुरुवातील कासवाला पाणी पिताना पाहून ती महिला म्हणते की त्याला खूप तहान लागली होती. पण महिलेच्या दयाळूपणाच्या बदल्यात, कासवाने असे काही केले की सर्वच आश्चर्यचकित झाले. कासवाने एवढा जोरदार हल्ला केला की ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. हा व्हिडिओ एकूण 43 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.



कशामुळे तापलं कासव?


पाणी देण्याबरोबरच महिला कासवाच्या चेहऱ्यावर आणि अंगावरही पाणी टाकत होती. कासवाला उन्हामुळे खूप गरम वाटत असावे, असे त्या महिलेला वाटले असावे. त्यामुळे त्याला पाणी देण्यासोबत ती कासवाच्या अंगावरही पाणी टाकत होती. पण कासवाला तिचं असं करणं आवडलं नाही. पाणी पडू लागताच कासवाला अचानक राग आला. त्याने अचानक चेहरा वर करून महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यात महिला वाचली. कासवाच्या या हल्ल्याच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


सहसा कासव कोणावरही हल्ला करत नाही. तसेच ते क्रूर प्राण्यांच्या श्रेणीत येत नाही. पण या कासवाचे कृत्य कोणाच्याही समजण्यापलीकडचे होते. म्हणूनच कासवाचे हे रूप पाहून व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.


विहिरीत पडलेल्या हरणाला दिले जीवदान


दरम्यान, नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसुल गावातील मोठा मळा भागात किरण पवार यांच्या विहिरीमध्ये हरिण पाडल्याची घटना घडल्याचे समोर आहे. संबंधित शेतकरी विहिरीजवळ गेला असता हरीण विहिरीत पडलेले दिसले. शेतकऱ्याने त्वरित वन विभागाशी संपर्क केला. वन अधिकारी अक्षय म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनानुसार वन कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत खोलवर विहिरीत उतरत पिंजराच्या सहाय्याने हरणाला सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले आहे.