Virgin Birth in Crocodile : एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. संबधांशिवया प्रजनन अशक्य आहे. प्राणी आणि मनुष्यांमध्ये लैंगिक प्रजजन होते. मात्र, एका मादी मगरीने नर मगरीसह संबध न ठेवता अंडी घालती आहे. कुणीशी संबध न ठेवता मगरीचे प्रजनन  झाल्याने वैज्ञानिक हैराण झाले आहेत. वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत.


16 वर्षांपासून एकटीच राहत होती ही मगर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोस्टा रिका मधील हे प्रकरण आहे.  2018 मध्ये या मगरीने अंडी घातली. ज्या तलावत ही मगर राहत होती त्या तलावात तिच्यासह इतर कुणीही नव्हते. 16  वर्षांपासून ही मगर एकटीच राहत होती. कोणतीही नर या मगरीच्या संपर्कात आलेला नव्हता. नरासह कोणत्याही प्रकराचे संबध न ठेवता मगरीने अंडी घातल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नराशी संपर्क न ठेवता प्रजननकरण्याची क्षमता असते.


वैज्ञानिक हैराण


प्रथमच एका मगरीने नराशी संबध न ठेवता अंडी घातल्याने वैज्ञानिक देखील हैराण झाले आहे. 2018 मध्ये कोस्टारिकामध्ये नराशी संबधन न ठेवता गरोदर राहिलेल्या मगरीच्या प्रजननवर वैज्ञानिक संशोधन करत आहेत.  मगरीने घातलेल्या एका अंड्यात त्याच्यासारखी मगरीची मादी होती. हे दृश्य पाहून अमेरिकन शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले. साश्त्रज्ञ सध्या या मगरीच्या  जनुकीय प्रक्रियेचा अभ्यास करत आहे. 


असा उघडकीस आला प्रकार


कोस्टा रिका मधील या मादी मगरीने 14 अंडी घातली होती. त्यांची काळजी घेण्यासाठी ती सतत पाण्याबाहेर येत होती. प्राणीसंग्रहालयाच्या रक्षकाने याची माहिती दिली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ही मादी मगरी गेल्या 16 वर्षांपासून कोणत्याही नर मगरीच्या संपर्कात आली नव्हती.  मग हे कसं काय शक्य झाले हे जाणून घेण्यासाठी संशोधन सुरू झाले.


व्हर्जिन बर्थ 


या मगरीने नराधी संबध न ठेवता अंडी घातली आहेत. याला वैद्यकिय भाषेत व्हर्जिन बर्थ (Virgin Birth in Crocodile) असेही म्हणतात. व्हर्जिन बर्थ म्हणजे लैंगिक पुनरुत्पादनाशिवाय नवीन जीवनाची उत्पत्ती करणे. त्यामध्ये सेक्स क्रोमोसोम नसतात. ते केवळ पार्थेनोजेनेसिसद्वारे पुनरुत्पादन करतात. मादी सरपटणारे प्राणी कधीकधी त्यांच्या शरीरात अनेक वर्षे नरांचे वीर्य साठवतात. यानंतर त्यांच्यापासून गर्भधारणा करतात. व्हर्जिन बर्थ मध्ये स्वतःच्या दोन पेशींचे मिश्रण करून संभाव्य भ्रूण तयार देखील तयार केले जाते. शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या प्राण्यांवर संशोधन करत आहे.