नवी दिल्ली : चीन नंतर आता कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात देखील आढळले आहेत. त्यामुळे भारत सरकार यासंदर्भात विशेष काळजी घेताना दिसत आहे. ५ फेब्रुवारी किंवा त्याआधी जारी केलेले चीनी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढची सुचना मिळेपर्यंत हे व्हिसा रद्द राहणार आहेत. याव्यतिरिक्त इराण, जपान आणि दक्षिण कोरियातील नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरस संदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्वाची मिटींग बोलावली आहे. कोरोना वायरसला घाबरण्याची गरज नाही. यासंदर्भात परिक्षण सुरु असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. भारतात येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. संशयितांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.



विविध राज्य आणि विभाग मिळून यावर काम करत असल्याचे देखील पंतप्रधान म्हणाले. 



कोरोना’ या जीवघेण्या विषाणूचा मोठा उद्रेक दिसून येत आहे. जगभरात नव्याने ३००० लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमध्ये २,९१२ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच नव्या रिपोर्टनुसार आणखी ४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.


राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चीनमधील कोरोनो विषाणू बाधितांचा आकडा जाहीर केला आहे.


आरोग्य अधिकाऱ्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला कोरोनो व्हायरसचा संसर्ग होण्याचे कमी प्रमाण नोंदविले गेले. २०२ नवीन रुग्ण आढलेले आहेत. 


सर्वाधिक मृतांची संख्या हुवेई प्रांतातील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गजग्य रोगाला ‘कोविड-१९’ असे नाव दिले आहे.