मॉस्को : रशिया-युक्रेन यांच्यात युद्धसंघर्ष सुरू आहे. या युद्धसंघर्षा दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविषयीची एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या गोष्टीमुळे अनेकांना धक्काही बसला आहे. पेंटागन आणि युक्रेन यांच्या एका गुप्त अहवालात हा खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना कर्करोग आहे ज्यामुळे त्याचा चेहरा नेहमी फुगलेला असतो. पुतीन यांना Bowel Cancer असल्याचं समोर आलं आहे. यातून बरं होण्यासाठी सध्या त्यांच्यावर केमोथेअरपी सुरू आहे. 


आजारानं बनवलं आक्रमक?


डेली स्टार यूकेच्या एक्स्क्लुझिव्ह रिपोर्टमधून अमेरिकी सूत्रांच्या हवाल्याने व्लादिमीर पुतीन यांच्या चेहऱ्यावर आता हसू दिसत नाहीत. यामागचं दु:खं नेमकं काय आहे ते समोर आलं आहे. पुतीन सतत रागवलेले का असतात याचं कारण आता समोर आलं आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुतीन यांच्याजवळ जास्त वेळ नाही हे त्यांना कळलं आहे. पेंटागनमधून काम करणाऱ्या माजी सैन्याच्या एक गुप्त अधिकाऱ्याने याबाबत सांगितलं. पुतीन यांना माहीत आहे की त्यांच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे ते जास्त आक्रमक होत आहेत. 


ही गोष्ट जबाबदार?पुतीन यांना हा आजार, म्हणून प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा


कोरोनामुळे देखील पुतीन चिंतेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ते आपल्या अधिकाऱ्यांशी देखील बोलताना विशेष अंतर बाळगूनच बोलतात. पुतीन Muscle Boosting Drugs घेतात. त्यामुळे त्यांचा चेहरा बदलला आहे. याआधी त्यांचे जुने व्हिडीओ पाहिले तर लक्षात येईल की त्यांचा चेहऱ्यामध्ये खूप बदल झाला आहे. पुतीन Anabolic Steroids चा वापर देखील करत असावेत अशी शंका उपस्थित केली जात आहे. 


काही तज्ज्ञांच्या मते कोरोना काळात व्लादिमीर पुतीन खूप जास्त काळ आयसोलेशनमध्ये राहिले होते. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक स्वास्थावरही झालेला असू शकतो. त्यानंतर युक्रेनच्या हल्ल्याचे संकेतही मिळाले होते. पुतीन यांच्या आरोग्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र त्यांनी स्वत: अद्याप यावर मौन धारण केलं आहे.