नवी दिल्ली : रशिया विरुद्ध युक्रेन अजूनही संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष कधी थांबणार याकडे जगाचं लक्ष आहे. या युद्धादरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्‍ला‍दिमीर पुतीन यांना कॅन्सर झाल्याची चर्चा होती. आता त्याचसोबत आणखी एका गंभीर आजारानं ग्रासल्याचा दावा ब्रिटनचे माजी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्‍ला‍दिमीर पुतीन यांना पार्किन्सन (Parkinson’s Disease) या गंभीर आजारानं ग्रासल्याचा दावा सर रिचर्ड डिअरलोव यांनी केला आहे. यामुळे ते स्टेरॉइड घेत असावेत असंही त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्राला ते याबद्दल सांगताना म्हणाले की ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यापूर्वी स्टेरॉईडचं नाव जरी काढलं तरी ते रागाने लालबुंद व्हायचे. 


 पार्किन्सन हा एक मेंदूमधील आजार आहे. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. हा आजार स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये 50 टक्के जास्त आढळून येतो. या आजाराने ग्रासलेले रुग्ण शरीरासोबत मनानेही खचतात त्यांच्या वागण्या बोलण्यात अनेक बदल दिसून येतात. 


हा आजार झालेल्या रुग्णांचं संतुलन राहात नाही. त्यांना नैराश्य, झोपेच्या समस्या, स्मरणशक्तीच्या समस्या आणि थकवा अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.  या आजाराची सुरुवात वयाच्या 60 व्या वर्षी होते. जीन म्युटेशनमुळे हे घडले असावे, असे शास्त्रज्ञ सांगतात.


स्‍टेरॉयड या प्रकारचे आजार बरे करण्यासाठी चांगलं असतं. आधीच पुतीन यांना कॅन्सर झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता हा नवीन आजार समोर आला आहे.