China Viral News : चीनच्या (China) पूर्वेकडील झेजियांग (zhejiang) प्रांतामधील एक रेस्तराँरंट नको त्या कारणासाठी चर्चेत आहेत. या रेस्तराँरंचं नाव आहे 'वूकॉन्ग' (Wukong). येथील एका महिला वेटरच्या चुकीमुळे तब्बल सात ग्राहकांना रुग्णालयामध्ये (china hospital) दाखल करावं लागलं आहे. या महिला वेटरने ऑर्डर आणताना अनेक टेबलवर ज्यूस ऐवजी लादी साफ करण्याचं लिक्वीड ठेवलं. ज्यूस समजून हे लिक्वीड प्यायल्याने अनेक ग्राहकांना मळमळू लागलं आणि त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'वूकॉन्ग' रेस्तराँरंटमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असतानाच हा प्रकार घडला. 'वूकॉन्ग' हे एक लोकप्रिय रेस्तराँरंट असल्याने नेहमीप्रमाणे अनेकजण आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रमैत्रीणींबरोबर खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आले होते. रेस्तराँरंट पूर्ण क्षमतेनं भरलेलं असतानाच एका महिला वेटरने ज्यूसऐवजी चुकून फ्लोअर क्लीनर म्हणजेच लादी पुसण्याचं फिनेल ग्राहकांच्या टेबलवर नेऊन ठेवलं. ज्यूस समजून या फिनेलचं सेवन केल्याने सात ग्राहकांची प्रकृती बिघडली. 


ग्राहकांना हवी नुकसानभरपाई


या सातही ग्राहकांना रुग्णलयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आता या ग्राहकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ही संपूर्ण घटना 16 जानेवारीची असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यासंदर्भातील माहिती आता समोर आली असून ती सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे.


रेस्तराँरंटने दिलं स्पष्टीकरण


रेस्तराँरंटने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये चुकून या महिला कर्मचाऱ्याने ज्यूऐवजी फिनेल टेबलवर ठेवल्याचं सांगितलं. या महिलेला दृष्टीसंदर्भातील अडचणी असल्याचंही रेस्तराँरंटने म्हटलं आहे. या महिलेनेही चुकून आपल्याकडून हा प्रकार घडल्याचं मान्य केलं आहे. आपण या ठिकाणी नव्याने नोकरीला लागलो असून डोळ्यासंदर्भातील तक्रार असल्याने चुकून आपल्याकडून हे घडलं असं या महिलेने म्हटलं आहे. 'वूकॉन्ग'ने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये, "ही महिला या ठिकाणी दोन दिवसांपूर्वीच रुजू झाली आहे. त्यामुळे तिच्याकडून चूकन हा प्रकार घडला. चीनमध्ये अनेक प्रकारचे फ्लोअर क्लिनींग ब्रॅण्ड आहेत. त्यापैकी काही संत्र्याच्या रंगाच्या पाकिटांमध्ये तेतात. एका चीनी ऑनलाइन वेबसाईटवर ज्या फ्लोअर क्लिनरमुळे हा प्रकार घडला त्याबद्दलची माहिती घेतली असता पाकिटावर परदेशी भाषेत नाव लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे ग्राहकांनाही या लिक्वीडसंदर्भात शंका आली नाही. चुकून त्यांनी हे प्यायलं," असं म्हटलं आहे.