लंडन : भारनियमन ही आपल्याकडची तशी नेहमीचीच समस्या. इतकी की अलिकडे लोकांना त्याची सवयच होऊन बसली आहे. त्यामुळे जनतेसह सरकारही वीज तुटवड्याबाबत नेहमी हैराण असते. अशात एक दिलासा देणारा आशेचा आणखी एक किरण दिसला आहे. संशोधकांचा दावा आहे की, रद्दी टॉयलेट पेपरपासूनही वीज निर्मिती करता येऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे की, दोन पायांनी चालवण्यात येणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून रद्दी टॉयलेट पेपरपासून वीजनिर्मिती होऊ शकते. तसेच, यासाठी येणारा खर्चही माफक असून, तो घराच्या छतावर लावण्यात येणाऱ्या सौर पॅनल इतका असू शकतो. पश्चिम युरोपमधील एम्सटर्डम विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केला आहे.


टॉयलेट पेपर हा कोणत्याच कामाचा नसल्याचे अनेकांचे म्हणने असते. पण, हा कार्बनचा एक चांगला स्त्रोत ठरू शकतो. तसेच, प्रदुषणाला आळा घालत टॉयलेट रद्दी पेपर पासून वीज निर्मिती हा एक प्रचलिती वीज निर्मिती पद्धतीला मोठा पर्याय ठरू शकतो असाही दावा संशोधकांनी केला आहे.