काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी एक भीषण बॉम्बस्फोट झाला. एका रुग्णवाहिकेत हा बॉम्बस्फोट झाला असून या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४०हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्र्यांनी या दुर्घटनेत ७५ नागरिक जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी तालिबानने स्विकारली आहे.


न्यूज एजन्सी APने अफगाणिस्तानच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचा हवाला देत मृतकांची संख्या ४०वर गेल्याचं म्हटलं आहे.


ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला त्याच परिसरात अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाची इमारत तसेच इतर देशांचे दूतावास आहेत. सुरक्षा दलाने सुरक्षेच्या दृष्टीने गृह मंत्रालयाची इमारत रिकामी केली आहे. 


अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयातील प्रवक्ता नसरत रहीमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेत बसलेल्या दहशतवाद्यांनी चेक पोस्टवर पोलिसांना सांगितलं की, रुग्णाला जवळील हॉस्पिटलमध्ये नेत आहोत. त्यानंतर दुसऱ्या चेक पॉईंटवर त्यांनी रुग्णवाहिकेत ठेवलेल्या स्फोटकांच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. 



यापूर्वी शुक्रवारी गजनी परिसरात एका घरावर रॉकेट हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकाच परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाला होता.