Viral Video: अमेरिकेतून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलं आहे. एका व्यक्तीला रस्ताने जाताना कारने धडक मारली. त्यानंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटलला घेऊन जायचं सोडून आरोपीने त्या व्यक्तीचा खिशा साफ केला. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. द न्यूयॉर्क पोलीस डिमार्टमेंटने हा व्हिडीओ ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर यूजर्सने आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक व्यक्ती रस्त्याने जात असताना अचानक एक कार त्याला धडक देते. या कारची धडक इतकी जोरदार होती की तो दूर फेकल्या गेला. तो व्यक्ती बेशुद्ध पडला. या घटनेनंतर कारचालक त्याचाजवळ येतात मात्र ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी नाही तर त्याचा खिशा साफ करण्यासाठी येतात. या घटनेनंतर आरोपी त्या जखमीला सोडून पळून जातात. 


अपघातात व्यक्ती गंभीर जखमी


न्यूयॉर्क पोस्टनुसार, घटनेची पुष्टी मिळताच घटनास्थळावर इमरजेन्सी क्रू पोहोचलं आणि जखमीला लिंकन हॉस्पिटलला दाखल केलं. या दुर्घटनाग्रस्त व्यक्तीची तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


पोलिसांनी शेअर केला व्हिडीओ



द न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंटने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओवर त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, तुम्ही या लोकांना ओळखता का? 23 जुलैला ही घटना सकाळी 6 वाजून 40 मिनिटाने घडली आहे. आरोपींनी 39 वर्षीय व्यक्तीला कारने धडक दिली आणि त्यांचाजवळील पैसे घेऊन पळून गेले. त्या घटनेबद्दल काहीही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क करा. पोलिसांनी यासोबत एक नंबरसुद्धा दिला आहे.