VIDEO : मोदींसाठी हे हिंदी गाणे सादर केले आणि मोदींनी अशी दिली दाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले.
वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते दोन्ही देशांचे संबंध कधी अधिक मजबूत होतील, यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, मोदींना चीनच्या दौऱ्यावर एक सुखद धक्का चीनच्या गायक-वादकांनी दिला. दोन दिवसांच्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चीनमध्ये गेलेले मोदी यांच्या सन्मानार्थ चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी हास्य करुन वादकांना दाद दिली. मोदी कौतुकाने वादकाचे निरीक्षण करुन हिंदी गाण्याचा आस्वाद घेत दाद दिली. ( गाण्याचा व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)
डोकलाम संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध विकोपाला गेलेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत-चीन संबंध सुधारण्याचा निर्धार करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अनौपचारिक शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी हा दृढनिर्धार व्यक्त केलाय. दरम्यान, मोदींची स्वागत करताना ..तू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा, हे गाणे वादकांनी वाजवले आणि मोदींनीही वादकांसाठी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी झील इस्ट लेकच्या किनारी मॉर्निंग वॉक केला. यानंतर दोघांनीही नौकाविहार करत मैत्रीचा संदेशही दिला.