OSIRIS-REx, Bennu Asteroid: बेन्नू (bennu asteroid) नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशाने येत आहे. 159 वर्षानंतर बेन्नू लघुग्रह पृत्वीवर कोसळणार आहे. मात्र, त्या आधीच या लघुग्रहाचे सॅम्पल NASA ने पृथ्वीवर आणले आहेत. या तुकड्याचे संशोधन करण्यात आले. याच्य सॅम्पलमध्ये पाणी आणि कार्बनचे अंश सापडले आहेत.   NASA ने पृथ्वीवर आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्याबाबत सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 सप्टेंबर 2182  Bennu हा  लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. 159 वर्षानंतर हाच लघुग्रह पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरू शकतो.  यामुळे 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे महाभयंकर विनाश पृथ्वीवर होणार आहे. दरम्यान, दर 6 वर्षांनी   बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जात आहे. मात्र, त्याआधीच  24 सप्टेंबर 2023 रोजी या लघुग्रहाचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले आहेत. 


जीवसृष्टीचे रहस्य उलगडणार


नासाने बुधवारी ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटर येथे Bennu लघुग्रहाचे सॅम्पल सर्वांना दाखवले तसेच यात नेमकं काय आहे हे देखील जाहीर केले. ह्यूस्टनमधील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये Bennu  लघुग्रहाच्या तुकड्यावर संशोधन करण्यात आले. Bennu  लघुग्रहाच्या तुकड्यामुळे जीवसृष्टीचे रहस्य उलगणार आहेत. या लघुग्रहाच्या संशोधनामुळे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सौरमालेच्या सुरुवातीस पृथ्वी आणि जीवन कसे अस्तित्वात आले  याबाबत महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे. कारण,  लघुग्रहाच्या सॅम्पलमध्ये उच्च-कार्बन तसेच पाण्याचे अंश सापडले असल्याची माहिती या लघुग्रबाबत संशोधन करणाऱ्या टीमकडून देण्यात आली.  जीवसृष्टीच्या निर्मितीबाबतचे मोठ रहस्य देखील उलगडणार आहे. 


थ्री D टेक्नॉलटजीच्या मदतीने संशोधन


scanning electron microscope, infrared measurements, X-ray diffraction,  chemical element analysis. X-ray computed tomography यांच्या मदतीने अत्यंत सावधीपूर्वक या लघुग्रहाच्या सॅम्पलचे परिक्षण करण्यात आले. यानंतर थ्री टेक्नॉलटजीच्या मदतीने धुळ आणि मातीसारख्या बारीक कणांचे परिक्षण करण्यात आले. यावरुन याच्यामध्ये पृथ्वीवरील जीवसृष्टीप्रमाणे मिळते जुळते घटक सापडले आहेत. प्रामुख्याने यामध्ये कार्बनचा समावेश आहे. 


सात वर्षांपूर्वी नासाने लाँच केले होते मिशन OSIRIS-REx 


पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकतात अशा लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी नासाचे हे पहिलेच मिशन आहे. याला  OSIRIS-REx मिशन असे नाव देण्यात आले आहे. बेन्नू लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी सात वर्षांपूर्वी मिशन लाँच करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी  Bennu लघुग्रहा नमुने गोळा केले होते. तेव्हापासून हे कॅप्सुल पृथ्वीच्या दिशेने परतत होते.   24 सप्टेंबर 2023 रोजी  643 कोटी किलोमीटरचा प्रवास करून कॅप्सूलच्या आकाराच्या अंतराळातून  Bennu लघुग्रहाचा तुकडा आणण्यात आला आहे. ही कॅप्सूल लहान फ्रीजच्या आकाराची आहे. OSIRIS-REx चे पूर्ण नाव Origins, Spectral Interpretation, Resource Identification and Security Rigolith Explorer आहे.