सुमीत बागुल, झी मीडिया, मुंबई : पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का? अथांग आकाश गंगांमध्ये आपण एकटे आहोत की बाहेरही कुणी राहतं? हे शोधण्याचा मणुष्यप्राणी कायम प्रयत्न करत असतो. कधी चंद्रावर कधी मंगळवार, अनेक देश आपले उपग्रह पाठवून नवनवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हापासून चंद्रावर पाणी असू शकतं याचा शोध लागला, तेंव्हापासून या पाण्याचा स्रोत काय याबाबत माहिती मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न सुरु झाला. याचबाबत एक नवीन माहिती समोर आलीये. ही माहिती प्रचंड आश्चर्यचकित करणारी अशीच आहे. चंद्रावर असलेलं पाणी हे ज्वालामुखीमुळे तिथं निर्माण झालं असू शकतं, असं बोललं जातं.  आतातपर्यंतच्या संशोधनानुसार चंद्रावर या आधी ज्वलामुखींचे स्फोट झाले आहेत.  


चंद्रावर ज्वालामुखीचे स्फोट हे साधारणतः 4.2 खरब वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. वैज्ञानिकांना वाटतं की साधारतः  1 अरब  वर्षांपर्यंत  ही प्रक्रिया चंद्रावर सुरु होती. चंद्रावरील पृष्ठभागावर असणारे मोठाले डाग हे ज्वालामुखीय डोंगरांची मैदानं आहेत. ज्यांचा जन्म ज्वालामुखीच्या स्फोटाने झाला असावा.


दरम्यान या स्फोटानंतर गॅस उत्सर्जित झालेले का? हे गॅसेस चंद्राच्या वातावरणात कैद झालेले का? हे गॅसेस थंड झाल्यानंतर त्यांचं बर्फात रूपांतर झालेलं का? बर्फात रूपांतर होऊन हे तुकडे जिथं सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथं, चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेले का? अशा अनेक बाबींचा वैज्ञानिक आता अभ्यास करत आहेत.


'आमच्या मॉडेलचा अंदाज आहे की एकूण H20 वस्तुमानांपैकी 41 टक्के वस्तुमान चंद्राच्या ध्रुवावर पुन्हा घनरूप होऊन बर्फासारखे जमा झाले असावे. ते लांबी रुंदीने शेकडो मीटर जाड असावे' अशी शक्यता वैज्ञानिकांना वाटते. वैज्ञानिकांनी याबात प्लॅनेटरी सायन्स जनरलमध्ये अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे.


शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, चंद्रावरील ज्वालामुखीय घटनांचा कालावधी खूपच कमी असावा. तिथं प्रत्येक उंची म्हणजेच अल्टीट्यूडवर बर्फाच्या रूपात पाणी असायला हवं. जे की चंद्राच्या ध्रुवांवर बनवलेले असावं असं वैज्ञानिकांना वाटतं.  


संशोधकांचा हा अभ्यास एका हाइपोथिसिसवर आधारित आहे. ज्वालामुखीच्या प्रक्रियेमुळे तयार सर्व पाण्याच्या वाफेचे कण हे सौर वाऱ्यांमुळे नष्ट झाले नसतील. त्यापैकी काही दवांच्या स्वरूपात पृष्ठभागावर जमले असतील. त्यामुळेच चंद्रावर पाणी उपलब्ध असेल, असं वैज्ञानिकांना वाटतं आहे.