नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानी क्रिकेट टीमचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी टीम इंडियाच्या खेळाचं कौतुक केलं. यासह त्यांनी पाकिस्तानातील क्रिकेट टॅलेंटचं देखील कौतुक केले. शिवाय पाकिस्तानची टीम एक दिवस संपूर्ण जगातील टॉप टीम म्हणून नावारूपास येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय टीम  सतत त्यांच्या योजनांमध्ये बदल करत असते आणि केलेले बदल आमलात देखील आणते. म्हणून भारतीय क्रिकेट टीम संपूर्ण जागात अव्वल आहे. असं देखील इम्रान खान म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय पाकिस्तानकडे यापेक्षाही जास्त टॅलेंट आहे, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानी क्रिकेट टीमचं समर्थन केलं. पाकिस्तान क्रिकेट टीमकडे सुद्धा अधिक कौशल्य आहे. मात्र टीमने कधी त्यांच्या योजनांमध्ये सुधारणा केली नाही. त्याचप्रमाणे नवीन विचार देखील आमलात आणले नाही. त्यामुळे पाकिस्तानची क्रिकेट टीम मागे आहे. असं देखील त्यांनी सांगितलं. 



पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितले की, आता देशात प्रादेशिक क्रिकेट रचना तयार झाली आहे, आणि त्याचा फायदा आणि परिणाम येत्या दोन ते तीन वर्षांत दिसून येतील. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी इस्लामाबादच्या माध्यामाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य संरक्षक इम्रान म्हणाले की आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे मला खेळायला जास्त वेळ मिळत नाही. 'अगदी प्रामाणिकपणे सांगत आहे, मला क्रिकेटचे पाहायला वेळ नसतो. पण आता आमची पायाभूत सुविधा बदलली आहेत. त्यामुळे आम्ही लवकरच संपूर्ण जगात आमचं वर्चस्व प्रस्थापित करू.' असं देखील ते म्हणाले.