दुबईत नोकरीच्या संधी ! `या` 4 वेबसाईट्स करणार मदत
अनेक भारतीय तरूणांचं परदेशात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न असतं. परदेशामध्ये नोकरी करायची म्हटलं की सहाजिकच पहिलं प्राधान्य अमेरिकेला दिलं जातं. परंतू आज ही स्थिती बदलली आहे. परदेशामध्ये जाऊन नोकरी करताना अनेकांचा ओढा युएईमध्ये दुबई आणि शरजाह आहे.
मुंबई : अनेक भारतीय तरूणांचं परदेशात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न असतं. परदेशामध्ये नोकरी करायची म्हटलं की सहाजिकच पहिलं प्राधान्य अमेरिकेला दिलं जातं. परंतू आज ही स्थिती बदलली आहे. परदेशामध्ये जाऊन नोकरी करताना अनेकांचा ओढा युएईमध्ये दुबई आणि शरजाह आहे.
यूएई भारतीयांसाठी उत्तम
सध्या यूएई हा भारतीयांचा पसंतीचा पर्याय आहे. येथील दुसरी सगळ्यात मोठी कम्युनिटी ही भारतीय आहे.
यूएईमधील एक 1 दिनार म्हणजे भारतीय रूपयांमध्ये त्याची किंमत 17 रूपये आहे. त्यामुळे युएईमध्ये पैसे कमावून भारतीय पैशांच्या मूल्यात त्याचा फायदा अधिक होतो.
तुमच्या फायद्यासाठी काही वेबसाईट्स
buzzon.khaleejtimes.com
युएईच्या डेली खलीज टाईम्सशी निगडीत हे पोर्टल आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही नोकरी शोधू शकता. तुमचं नावं रजिस्स्टर न करताही नोकरी शोधू शकता.
Bayt.com
Bayt.com ही वेबसाईट तुम्हांला जगभरात नोकरी शोधायला मदत करते. मात्र तुम्हांला दुबईतच नोकरी शोधायची असेल तर www.bayt.com/en/uae/ वर क्लिक करा. युएई मधील प्रमुख कंपन्यांसाठी येथून पदभरती होते. त्यासाठी तुम्हांला रजिस्टर करावे लागते.
EmiratesVillage.com
हे युएईमधील लोकप्रिय जॉब पोर्टल आहे. येथे अनेक प्रकारच्या उपलब्ध जॉबची माहिती दिली जाते. अनेक लहान शहरातीलही जॉबच्या ऑफर येथे दिसतील.
कोणकोणत्या नोकर्या ?
अॅडमिनिस्टर, फायनान्स, मॅनेजमेंट, कस्टमर सर्व्हिस, हॉस्पिटॅलिटी, नर्सिंग, मार्केटिंग पीआर, हेल्थकेअर, ह्युमन रिसॉर्स, इंजिनियरिंग़, आयटी आणि सेल्स