मुंबई : ट्रॅफिक म्हटलं की, ते आपल्याला नको नकोसच वाटतं. त्यात काही वेळा ट्राफिकमुळे लोकांना अर्धा-एक तास ट्राफिकमध्येच थांबावे लागले, तेव्हा तर लोकांची चिडचिड देखील होते. परंतु तुम्हाला माहित आहे का? की दक्षिण बेल्जियममध्ये एक ट्राफिक लागलं आहे. जे गेल्या 75 वर्षापासून अद्याप सुटलेलं नाही. हो हे खरं आहे की, दक्षिण बेल्जियमच्या घनदाट जंगलात गेल्या 75 वर्षांपासून वाहतुकीची कोंडी झाली आहे. कारण महायुद्ध 2 च्या काळापासून येथे कारची स्मशानभूमी झाली (Car Graveyard) आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण बेल्जियममधील चाटेलॉन कार स्मशानभूमीत (Chatillon Car Graveyard) गेल्या 75 वर्षांपासून कार पार्क करण्यात आल्या आहेत. या गाड्या तिथे पार्क केल्यापासून आतापर्यंत इतका काळ निघून गेला आहे की, आता त्या गाड्यांच्या आतून झाडांच्या डहाळ्या वाढू लागल्या आहेत.


हे जंगल खूप दाट आहे, त्यामुळे इथे कुठूनही झाडे वाढू शकतात, हेच कारण आहे की, येथील कारमधून झाडे वाढू लागली आहेत.



जेव्हापासून लोकांना जंगलात कारची स्मशानभूमी आहे, हे समजले आहे. तेव्हापासून तेथे जाण्यास लोकांना भीती वाटू लागली आहे. या जागेवर काही अशुभ शक्ती असल्याचे ही सांगितले जात आहे. या कारचे त्या ठिकाणी असलेल्या अस्तित्वाचे खरे कारण समजू शकले नाही. काही लोकांचे म्हणणे असे आहे की, ते कारचे डंपींग ग्राउंड आहे.


तर काही लोकं असे सांगत आहेत की, दुसर्‍या महायुद्धात अमेरिकन सैनिकांनी आपल्या कार येथे लपवून ठेवल्या होत्या. कारण त्यांना जिंकल्यानंतर या गाड्यांमध्ये स्वार होऊन आपल्या देशात परत यायचे होते आणि तेव्हापासून या गाड्या जशा आहेत तशा तिथे उभ्या राहिल्या आहेत.