भारतात उद्या साडेपाच वाजलेले असतानाच `इथं` सुरु होणार 2025! ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड नाही तर...
Which Country Celebrates New Year First: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी नवीन वर्ष येतं असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चूकत आहात.
Which Country Celebrates New Year First: संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करायला सज्ज झालं आहे. नवीन वर्षाची सुरुवात होते तेव्हा सामान्यपणे ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताचे व्हिडीओ समोर येतात. मात्र जगात कोणात्या देशात पहिल्यांदा नवीन वर्ष येतं तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही कदाचित या देशाचं नावही ऐकलं नसेल. अर्थात हा देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून प्रसिद्ध असलेला जपान, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड नसून अगदी तुम्ही कधी नावही न ऐकलेला छोटासा देश आहे.
कोणता आहे हा देश?
तर ज्या देशामध्ये सर्वात आधी नवीन वर्ष येतं त्या देशाचं तो देश ओशिएनिक कंट्री म्हणजेच महासागरामध्ये असलेल्या छोट्या छोट्या बेटांवर वसलेल्या देशांपैकी एक आहे. या देशाचं नाव आहे, किरिबाटी प्रजासत्ताक! हा देश म्हणजे 30 छोट्या छोट्या बेटांपासून बनलेला आहे. या देशाच्या सर्वात पूर्वेकडील बेटांवरुन अंतरराष्ट्रीय तारीख रेषा म्हणजेच इंटरनॅशनल डेट लाइन जाते. किरिबाटीनंतरच न्यूझीलंड, रशिया, सिडनी आणि ऑस्ट्रेलियासारखे देश नवीन वर्षाचं स्वागत करतात.
भारतात साडेपाच वाजलेले असतानाच या देशात येतं नवीन वर्ष
वेगवगेळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळेला नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. किरिबाटी हा देश अंतरराष्ट्रीय टाइम झोनचा विचार केल्यास युटीएस+ 14 तास या वेळेनुसार चालतो. म्हणजेच भारतापेक्षा हा देश साडेसहा तास पुढे आहे. म्हणजेच 31 डिसेंबरचे सायंकाळचे साडेपाच वाजलेले असतील तेव्हा किरिबाटीमध्ये नवीन वर्ष आलेलं असेल. सिडनीमध्ये रात्री 9 वाजलेले असतात तेव्हा किरिबाटीमध्ये नवीन वर्ष सुरु होतं. लंडनमध्ये तर 31 डिसेंबरचे सकाळचे दहा वाजलेले असतानाच हा छोटासा देश नवीन वर्षात पदार्पण करतो. पॅरिस, बर्लीन आणि रोम हे लंडनपेक्षा एक तास पुढे आहेत. म्हणजेच किरिबाटीमध्ये नवीन वर्ष येतं तेव्हा या मोठ्या शहरांमध्ये 31 डिसेंबरचे सकाळचे 11 वाजलेले असतात. या देशानंतर सर्वात उशीराने नवीन वर्ष साजरा करणारा देश म्हणजे अमेरिका! कुक बेटांवर होतो. ही बेटं किरिबाटीपासून जवळच असली तरी दोघांमधून अंतरराष्ट्रीय डेट लाइन जाते. त्यामुळेच या दोन्ही ठिकाणांमध्ये 24 तासांचं अंतर आहे. म्हणजेच कुक बेटांवर 31 डिसेंबर सुरु होतो तेव्हाच किरिबाटीमध्ये नवीन वर्ष सुरु होतं.
किरिबाटी देशामध्ये असं साजरं होतं नवीन वर्ष
किरिबाटी हा देश कॉमनवेल्थ देशांपैकी एक आहे. म्हणजेच भारताप्रमाणे पूर्वी या देशावर ब्रिटीशांचं राज्य होतं. या देशाची लोकसंख्या अवघी 10 हजार इतकी आहे. या देशामध्ये सामान्यपणे स्नॉर्कलिंग, फटाक्यांची आतिषबाजी, स्विमिंग, मासेमारी, गोल्फ यासारख्या गोष्टींचा आनंद घेत नवीन वर्ष साजरं केलं जातं. तसेच डान्स आणि गायनाच्या कार्यक्रमांचेहा आयोजन केले जाते. किरिबाटीचा एकूण एरिया केवळ 811 स्वेअर किलोमीटर इतकाच आहे.