मुंबई : आपल्याला समुद्रात अनेक प्रकारचे जीव, मासे, शंख-शिंपले पाहायला मिळतात. कधी-कधी मात्र समुद्रात अशा वस्तू देखील मिळतात ज्याची माहिती आपल्याला नसते पण ती गोष्ट तुम्हाला करोडपती देखील करु शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्रात असे अनेक प्रकारचे दगड आपल्याला पाहायला मिळतात. ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. समुद्र किनारी फिरत असतांना जर तुम्हाला हा दगड सापडला तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हा दगड तुम्हाला काही मिनिटातच श्रीमंत करेल. हा कोणताही सामान्य दगड नाही आहे. हा एक व्हेल माशाच्या उल्टीपासून तयार झालेला दगड आहे.


अनेक व्य़क्ती या दगडाकडे दुर्लक्ष करतात. पण याची खूप जास्त मागणी आहे. याची किंमत कोटींमध्ये आहे. १७ कोटीच्या आसपास हा दगड विकला जातो.


'एम्बरगिरिस' नावाचा हा दगड सुरुवातीला खूप दुर्गंधी असतो पण नंतर त्यातून सुंगध निघतो. हा दगड काही दिवसांपूर्वी ओमानमध्ये एका मच्छिमाराला मिळाला होता. समुद्रावर तरंगतांना तो त्याला दिसला होता.