Relationship Advice for Boys : सर्व मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. तुम्हाला तुमच्या सर्व मित्रांमध्ये उठून दिसायचं असेल, कुणाला इम्प्रेस करायचं असेल तर मुली तुमच्याबाबत नेमका काय विचार करतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जर कोणाच्या जवळ जायचं असेल तर आपण त्या व्यक्तीचे काही गुण पाहतो आणि मगच त्या व्यक्तीच्या जवळ जावं की नाही हे ठरवत असतो. हल्ली तुम्ही काय खाता हे पाहिलं जात नाही. तर तुम्ही चारचौघात कसे वागता, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमची देहबोली कशी आहे, या सगळ्या पैलूंचा विचार हल्लीच्या मुली करतात. (What Girls Notice In Boys Find out now)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुली मुलांमध्ये अशा कोणत्या 9 गोष्टी पाहतात, चला जाणून घेऊयात 


1. तुमचा सुगंध (Your Scent)
आपण कुठेही वावरताना आपली उपस्थिती महत्त्वाची असते. मग तुम्ही ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, पार्टीत असाल किंवा Date वर जात असाल.. तुमचे कपडे आणि त्यावर वापरला जाणारा सेंट तुमच्याबाबत बरंच काही बोलून जातो. तुम्ही वापरणाऱ्या सेंटमुळे काही बोलायच्या आधी तुम्ही नोटीस होतात. 


2.  तुमची केशभूषा (Your Hairstyle)
तुमच्या सुगंधानंतर तुमच्याबाबतची महत्त्वाची नोटीस होणारी गोष्ट म्हणजे तुमची हेअरस्टाईल. मुलींना खूप फंकी हेअरस्टाईल असणारी मुलं आवडत नाहीत. तुमची हेअरस्टाईल नेहमीच साधी सरळ, सोबर असतील तर मुलींना तुम्ही आवडतात. तुमच्या केसांमुळे तुमचा चेहरा अधिक उठून दिसत असतो. 


3. तुमचा चेहरा (Your Face)
तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला पाहिजे, आयुष्यात काही तरी चांगलं करुन दाखवण्याची जिद्द असली पाहिजे. याचा मुली कायम विचार करतात. 


4. तुमचं स्मितहास्य (Your Smile)
आपण कानावर आसपासच्या नकारात्मक गोष्टी कायम पडतात. पण या परिस्थितीत तुम्ही कुणाला मोटिवेट करत असाल किंवा तुमच्या चेहऱ्यावर पॉझिटिव्ह स्माईल असेल तर मुलींना तो प्रचंड आवडतो. तुमच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यामुळे मुली इम्प्रेस होऊ शकतात. 


5. तुमची पर्सनॅलिटी (Your Personality)
मुलांची पर्सनॅलिटी मुलींना आकर्षित करते. तुमची पर्सनॅलिटी तुमच्याबाबत सर्व काही सांगत असते, मुलींना एखाद्या मुलाच्या पर्सनॅलिटीबाबत चटकन अंदाज लावता येतो. 


आणखी वाचा... Skin Care Tips: चेहऱ्यावर पाहिजे असेल ग्लो... रात्री झोपताना हा फेसपॅक जरुर लावा...


6. तुमचा स्वभाव (Behaviour)
तुम्ही दिसायला चांगले असाल, तुम्ही चांगल्या घरातून येत असाल तरीही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव. तुमचा स्वभाव इतरांना त्रास देणारा असेल तर मुली हे पटकन नोटीस करून अशा मुलांपासून दूर जातात. मात्र तुम्ही Down To Earth असाल, कायम इतरांना मदत करणारे असाल तर अशी मुलं मुलींना आवडतात. . तुम्ही इतरांशी आदरभावनेने वागता का? याकडेही मुलींचं बारिक लक्ष असते.


7. तुमचे कपडे (Your Cloth)
प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते. आपल्या शरीरावर काय छान वाटेल अशीच वेशभुषा करावी. तुमची पर्सनॅलिटी अधिक अधोरेखित करण्यात तुमची साधी वेशभूषा अत्यंत महत्त्वाची असते. महाग कपडे घातल्याने आपण छान दिसतो किंवा कुणालाही इम्प्रेस करू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. 


8. तुमचं आरोग्य (Your Health)
आरोग्य हिच धनसंपदा...  अनेकांना दारू आणि सिगारेटचं प्रचंड व्यसन असतं. अशी व्यसनी मुलं मुलींना आवडत  नाहीत. निरोगी असण्याला मुली कायम प्राधान्य देतात. 


9. तुमची आर्थिक गणितं (Your financial calculations)
तुम्ही किती वायफळ खर्च करता, योग्य ठिकाणी खर्च करतात की नाही, यावर मुलींचं लक्ष असतं. सोबतच तुमचं फ्युचर प्लॅनींग कसं आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही उधळपट्टी करत असाल तर मुली तुमचा पत्ता कट करू शकतात. गुंतवणूक करणाऱ्या किंवा सेव्हिंग करणाऱ्या मुलांना मुलींची पहिली पसंती मिळते. कारण यावर तुमचं फ्युचर आणि पुढील आर्थिक गणिते अवलंबून असतात.


आता तुम्हाला मुली तुमच्यात नेमकं काय पाहतात याचा अंदाज आला असेल. वरील suggestions ने तुम्हाला काही फायदा होईल अशी आशा करतो.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)


आणखी वाचा... बाळंतपणाच्या 15 तासानंतर BEd ची दिली परिक्षा, प्रेरणादायी कहाणी