एका रात्रीत असं झालं तरी काय? लोकसंख्या डायरेक्ट दुप्पट झाली....
रात्रीत एका देशाची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. नेमंक काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
Viral News : प्रत्येक देशासमोर आता लोकसंख्यावाढीचा मोठा प्रश्न समोर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. कारण खनिजसाठे तेवढेच आहेत मात्र त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यामुळे प्रत्येक देश लोकसंख्या नियंत्रणात येण्यासाठी काहीना ना काही उपाययोजना करत आहेत. अशातच रात्रीत एका देशाची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. नेमंक काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. (What if it happens in one night Papua New Guinea The population directly doubled latest marathi news)
पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) असं देशाचं नाव असून अधिकृतपणे या देशाची लोकसंख्या ही 90 लाख 40 हजार इतकी आहे. मात्र नुकताच संयुक्त राष्ट्रांच्या (U.N.) अभ्यासात या लोकसंख्येबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. कारण या देशाची लोकसंख्या ही दुप्पट झाली आहे. परंतु तिथल्या सरकारने ही आकडेवारी लवपण्याचा प्रयत्न केल्याचं या अहवालामध्ये समोर आलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अभ्यासानुसार पापुआ न्यू गिनीची सध्याची लोकसंख्या सुमारे 17 दशलक्ष आहे, जी सध्याच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने म्हटले आहे की देशाची एकूण लोकसंख्या 17 दशलक्ष असू शकते, जी सुमारे 9.4 दशलक्ष असल्याचे मानले जात होते. जेव्हा अहवाल समोर आल्यावर, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी याबाबतची माहिती नसल्याचं मान्य केलं आणि लोकसंख्या ही दुप्पट म्हणजेच 17 दशलक्ष असल्याचा दावाही फेटाळून लावला आहे.
दरम्यान, जगातील सर्वात धोकादायक आणि हिंसक राष्ट्रांपैकी पापुआ न्यू गिनी राष्ट्र आहे. या देशात मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी टोळ्यांच वास्तव्य आहे. गरीब देशांपैकी एक असा हा देश आहे.