नवी दिल्ली : कोरोना विषाणूबद्दल बरेच देश जागतिक आरोग्य संघटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जगात या बाबत चर्चा सुरु असताना आता एक गोष्ट चर्चेत आली आहे. WHO ने आपल्या वेबसाईटवर त्यांच्या गुडविल अॅम्बेसडर पेंग लियुआन यांचा परिचय देताना त्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पत्नी असल्याचा उल्लेख टाळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डब्ल्यूएचओने गुडविल अॅम्बेसडर म्हणून आपल्या वेबसाईटवर नऊ जणांची नावे दिली आहेत. जेव्हा पेंग यांची पदावर निवड झाली तेव्हा डब्ल्यूएचओचे तत्कालीन प्रमुख मार्गारेट चान म्हणाले होते की पेंग या आपल्या आवाजासाठी आणि एक चांगली स्त्री म्हणून ओळखल्या जातात. 2011 मध्ये पेंग यांची पहिल्यादा निवड झाली होती. नंतर त्यांना डब्ल्यूएचओचे प्रमुख, टेड्रोस यांनी पुन्हा नियुक्त केले होते.


डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसा, ब्रिटनचे खासदार आणि परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष टॉम टी म्हणाले की, गुडविलची परिभाषा लांब करण्यात आली आहे असे दिसते. डब्ल्यूएचओने अशा लोकांना निवडले पाहिजे जे लोकांच्या हक्कांवर प्रत्यक्ष काम करतात, ज्यांचे काम संशयास्पद आहे त्यांना नाही. पेंग यांचा 1987 मध्ये जिनपिंग यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यावेळी जिनपिंग चीनच्या झियामेनचे उपमहापौर होते आणि त्यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता.


अमेरिकेसह अनेक देश हे आरोप करीत आहेत की डब्ल्यूएचओने जगाला कोरोनाबाबत वेळेवर सूचना नाही दिल्या. आणि हे चीनमुळे केलं गेलं. अमेरिका आणि जर्मनीच्या गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्यात असेही पुढे आले आहे की, चीनच्या अध्यक्षांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना कोरोनाशी संबंधित माहिती देण्यापासून रोखले होते. परंतु डब्ल्यूएचओने याला नकार दिला आहे. पण आता पुन्हा एकदा डब्ल्यूएचओशी पेंग यांच्याशी असलेले कनेक्शन वादाचा विषय बनू शकतो.