Man gives birth to baby: आजकाल जगाचच्या पाठीवर काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. आपल्या या दुनियेत कायमच चित्रविचित्र गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात. त्यातून पुरूषानं बाळाला जन्म दिला अश्या घटनाही पाहायला मिळतात. आताही अनेकदा अशा बातम्या समोर येताना दिसतात. अशा विषयांवर अनेक मराठी (marathi movies relesed today) आणि हिंदी चित्रपट आले आहे. मराठीमध्ये इश्श् (isshh) हा पिक्चर कोण लोकप्रिय झाला होता तर हिंदीमध्येही अशाप्रकारची फॅन्टसी वापरली गेली आहे. त्यातून आता रितेश देशमुखचाही असाच एक पिक्चर प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मिस्टर मम्मी (mister mommy) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (what is the truth behind man gives birth to baby girlfriend gets shocked)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या गोष्टी झाल्या फॅन्टसीपुरत्या. हीच फॅन्टसी किंवा काल्पनिक गोष्ट खरी वाटायलाही फार वेळ लागत नाही. परंतु कधी कधी वास्तवही अशा सिनेमांपुढे नतमस्तक होतं. या घटना आपल्याल प्रत्यक्षातही दिसू लागतात अशीच एक बातमी सध्या सगळीकडे व्हायरल होते आहे. ही गोष्ट अशाच एका कपलची आहे. या जोडप्याचे ऑनलाइन संवाद सुरू झाले. त्यांच्या प्रेमकथेला ऑनलाईनच सुरूवात झाली होती. इथूनच त्यांच्या प्रेमाला बहर आला आणि दोघांनीही आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत राहणारे हे जोडपे चार वर्षांपूर्वी भेटले होते. 27 वर्षीय निनो आणि 22 वर्षीय गर्लफ्रेंड जोस्लिन हे ट्रान्सजेंडर (transgender couple) जोडपे आहेत. 


आई वडिल म्हणून दोघेही खूश : 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


सध्या हे जोडपं अख्ख्या जगात चर्चेत आहेत. जोस्लिननं व्हिडीओ शेअर करत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली तिच्या बॉयफ्रेंडच्या पोटात अचानक दुखू लागले. तेव्हा अचानक समोर आलेलं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गरोदरपणाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडनं बाथरूममध्ये मुलाला जन्म दिला. लिंग बदलासाठी हार्मोन थेरपी वापरली जाते हेच निरोच्या बाबतीत घडलं. 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


हे जोडपे पालक होण्यासाठी खूप उत्सुक होते. यादरम्यान निनोने एका मुलाला जन्म दिला. सध्या हे दोघंही जणं आपलं पेरेन्टहूड सेलिब्रेट करताना दिसत आहेत. आईवडिल झाल्यामुळे दोघेही जण खूपच आनंदी आहेत. ते दोघंही खूप भावूक झालेले पाहायला मिळाले.