ब्लॅकबेरी आणि विंडोज फोनवर यापुढे वापरता येणार नाही व्हॉट्सअॅप !
31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप आपली सेवा काही ठराविक फोनसाठी बंद करणार आहे.
नवी दिल्ली : 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप आपली सेवा काही ठराविक फोनसाठी बंद करणार आहे.
ब्लॅकबेरी, विंडोजची सेवा बंद
तुमच्याकडे जर ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी 10, विंडोज फोन 8.0 आणि विंडोजचे जुने व्हर्जन या फोनवर 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅप या फोनवरची आपली सेवा बंद करणार आहे.
ट्विट करून दिली माहिती
व्हॉट्सअॅप या बाबतीत ट्विट करून आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे. त्याचबरोबर "नोकीया एस40" वरसुद्धा व्हॉट्सअॅपची सेवा बंद होणार आहे. अॅँड्रॉइड ओएस व्हर्जन 2.3.7 आणि त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवरसुद्धा 1 फेब्रुवारी 2020 पासून व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
व्हॉट्सअॅप देणार नवीन सुविधा
व्हॉट्सअॅपने यासंदर्भात एक ब्लॉग लिहिला आहे. या सर्व फोनवर सेवा बंद करण्याचं कारण आहे कि भविष्यात व्हॉट्सअॅपला ज्या सुविधा आपल्या ग्राहकांना द्यायच्या आहेत त्यासाठी हे सर्व फोन सक्षम नाहीत. ग्राहकांनी आपल्या फोनचे ओएस, विंडोज प्रणाली अद्ययावत करून घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.