नवी दिल्ली : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज भारत दौऱ्यावर आहेत. ६ दिवसाच्या भारत दौऱ्यावर ते आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इस्राईल यांची मैत्री खूप जुनी आहे. कारगिल युद्धात इस्राईलने भारताची मदद करत मैत्री निभावली होती. १९९९ मध्ये दहशतवाद्यांच्या रुपात पाकिस्तानी जवान कारगिल, द्रास सेक्टरमध्ये घुसले. ऑपरेशन विजय लॉन्च केला गेला. भारतीय जवानांना अशी ट्रेनिंग नव्हती की जे डोंगर किंवा उंच ठिकाणावरुन लढू शकतील.


पाकिस्तानचं सैन्य उंच भागावर होते. भारताला याची माहिती नव्हती की नेमकं पाकिस्तानचं सैन्य कुठे आहे. दुसऱ्या बाजुला त्यांचे फायटर जेट आणि सैन्याची माहिती मिळणं कठीण झालं होतं. त्यानंतर भारताने इस्राईलची मदत मागितली होती.


इस्राईलकडे मदत मागताच इस्राईलने कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरीविरोधात रणनिती बनवायला सुरुवात केली. इस्राईलच्या सैन्याकडे या गोष्टीचा पूर्ण अनुभव आणि तंत्रज्ञान देखील आहे. बॉर्डरवर कंट्रोल, काउंटर टेरेरिज्म आणि लिमिटेड वॉरमध्ये त्यांच्या सारखं जगात कोणीच नाही.


अमेरिकेचा दबाव असतांना सुद्धा इस्राईलने कारगिलच्या आधी ऑर्डर केलेले हत्यारं ताबडतोब भारताला पोहोचवली. हेरोन आणि सर्चर सारखे ड्रोन जे उंचावरुन निरीक्षण करतात आणि शत्रू कोठे आहे याबद्दल माहिती देतात ते भारताला पुरवले गेले. 


इस्राईलने फक्त मानवरहित एरियल ड्रोनच नाही तर मिलिट्री सॅटेलाइट्सवरुन फोटो देखील पुरवले. बोफोर्स फील्ड गनसाठी गोळ्या आणि हत्यारं देखील पुरवली. युद्धाच्या मैदानात मिराज 2000H फायटरसाठी इस्राईलने लेजर गायडेड मिसाईल देखील पुरवली. युद्धाच्या अशा कठीण प्रसंगी इस्राईलने भारताला मदत केली होती.