मुंबई : सोशल मीडीयाच्या माध्यमातून आपल्याला अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात, जे आपल्याला थक्कं करतात. आता अशीच एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जी खुपच अजब आहे. या महिलेने सोशल मीडियावर दावा केला आहे की, 10 वर्षे एकत्र राहिल्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर चार वर्षांनी विधवा महिलेला आपला नवरा आपली फसवणूक करत असल्याचे समोर आले. परंतु त्यानंतर या महिलेनं केलं जे, धक्कादायक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

36 वर्षीय TikTok यूजर ब्रिजेट डेव्हिसच्या पतीचा 2018 मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. पतीच्या निधनानंतर ती बायपोलर डिसऑर्डरची शिकार झाली.


आपल्या नवऱ्याचा चीटिंगची बातमी जेव्हा या महिलेला कळली, तेव्हा या महिलेनं नवऱ्याच्या गर्लफ्रेंडशी संपर्क साधला.


फॉलोअर्सनां सांगितली माहिती


दुःखी ब्रिजेटने सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सनां सांगितले की, तिचा नवऱ्याने कशी तिची फसवणूक केली. त्यानंतर तिने फॉलोअर्सला जे सांगितले, त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु या महिलेने तिचा आणि तिच्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे चॅट सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की, या महिलेनं खरंच असं काम केलं.


खरंतर आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर या महिलेला आपल्या नवऱ्याचं सत्य कळलं आणि तिला हे देखील कळलं होतं की, तो तिची फसवणूक करत आहे. ज्यामुळे या महिलेनं रागावणं अपेक्षीत होतं. परंतु या महिलेनं असं न करता आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला त्याच्या मृत्यूची बातमी कळवली.


सोशल मीडियावर ब्रिजेटने व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने दोघांमधील चॅट सर्वांना दाखवले.


या चॅटमध्ये, या महिलेच्या दिवंगत नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला कळते की, तिचा प्रियकर मरण पावला आहे, तेव्हा ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती. तिने लिहिले, "माझा विश्वास बसत नाही की, मी त्याला गमावले आहे, त्याने माझ्यासोबत राहण्याचे वचन दिले होते." त्यानंतर तिने ब्रिजेटला विचारले की, तिच्या प्रियकराला जिथे पुरले होते तिथे ती जाऊ शकते का? यावर ब्रिजेट काहीही विचार न करता तिला ती जागा सांगितली.