वडापावमधील हलका- मऊसर पाव भारतीय नव्हेच; या पदार्थाचं जन्मस्थळ अन् वय ऐकून विश्वास बसणार नाही
Food Facts about vadapav : कुठून आला पाव? पहिल्यांदा कोणी तयार केला हा पदार्थ? त्याचा पहिलावहिला फोटो पाहायचाय? कैक वर्ष मागचा प्रवास करण्यासाठी तयार व्हा...
Food Facts : वडापाव, भजीपाव, पावभाजी, पॅटीसपाव, अंड पाव, ब्रेड पकोडा, ब्रेड बटर, सँडविच, बर्गर अशा एक ना अनेक पदार्थांमधील महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाव. हा पदार्थ नेमका कुठून आला, त्याची सुरुवात कुठून झाली या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी रंजक आहेत. पण एक गोष्ट महितीये का, हा पदार्थ मूळचा भारतीय नाही.
अगदी सर्रासपणे आहाराचा भाग असणाऱ्या या पदार्थाचा समावेश भारतीयांकडून दैनंदिन आहारामध्येही केला जातानाच त्याचं मूळ नेमकं कुठे दडलंय याचा विचार कधी केला आहे का? अभ्यासक आणि जाणकारांच्या मते साधारण 14000 वर्ष मागे गेल्यास या ब्रेडच्या जन्माची पाळंमुळं सापडतात. तीसुद्धा जॉर्डन आणि 8000 वर्षांपूर्वीच्या इजिप्तमध्ये.
गतकाळात म्हणजे कैक हजार वर्षांपूर्वी ब्रेड तयार करण्यासाठी जव, गहू आणि रव्यासह विविध खाण्यायोग्य झाडांची मुळं, पाणी अशा साहित्याचा वापर केला जात होता. सध्या जो पाव आपण खातो ते या ब्रेडचं स्वरुप नसून, तो काहीसा चपटा, थोडक्यात एखाद्या पराठ्याइतरा फुगीर असावा असा तर्क लावण्यात येतो. ज्यामुळं सुरुवातीच्या काळात पाव तयार करण्यासाठी फर्मंटेशनचा वापर नसून, तेव्हा भट्ट्याही वेगळ्या असल्याचं म्हटलं जातं.
संशोधकांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार टायग्रिस, युफ्रिटीसच्या खोऱ्यास साधारण 9000 वर्षांपूर्वीच्या कालखंडात शेती होत असून, तसे पुरावेही उत्खनन विभागाच्या हाती लागले आहेत. इथंच घुमटाकार भट्ट्यांचे अवशेषही आढळल्यामुळं इथूनच ब्रेड किंवा पाव बनवण्याच्या प्रक्रियेत Fermantation चा वापर केला गेला असं म्हटलं जातं.
हेसुद्धा वाचा : नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड
इथंही दोन शक्यता वर्तवण्यात येत असून, यापैकी एक म्हणजे ब्रेडच्या पीठात त्या काळात काहींनी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे मद्य मिसळलं. हे पीठ त्यामुळं आंबलं आणि जेव्हा ते शिजण्यासाठी भट्टीत गेलं तेव्हा तयार झालेला पाव किंवा ब्रेड अधिक जाळीदार, फुगीर आणि मऊ असल्याचं लक्षात आलं.
9000 वर्षांपूर्वी पाव तयार करणारी महिला मानवी उत्क्रांतीच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण घटक मानली जात असून, विकिपीडियावरील माहितीनुसार साधारण 30000 वर्षांपूर्वीच्या जात्याच्या चाकांमध्ये तेव्हा धान्याचं पीठ तयार केलं जात होतं. टर्की आणि युरोपातील Neolithic क्षेत्रांमध्ये ब्रेड 9100 वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येतं. थोडक्यात आपण खातोय तो पाव किती वयस्कर आहे याचा अंदाज येतोय ना?