नवी दिल्ली : केनियातील जंगलात मादा जिराफ आणि तिच्या बछड्याची अनोखी जोडी निदर्शनास आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही जिराफ पांढ-या रंगांचे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते सर्वांनी आतापर्यंत पाहिलेल्या जिराफांसारखे नाहीये आणि त्यांच्यावर तसे ठसेही नाहीयेत. त्यामुळे या दुर्मिळ पांढ-या जिराफांची चर्चा जोरदार रंगली आहे. 



हे जिराफ असे पांढ-या रंगाचे का आहेत? याबाबत अनेक कयास लावले जात आहेत. यांचा असा रंग जेनेटीक कंडीशन ‘लूकिजम’मुळे बदलल्याचे बोलले जात आहे. ‘लूकिजम’मुळे त्वचेच्या कोशिकांमधून रंग घटत जातो. लूकिजममुळे डोळ्यांवर कोणताही परिणाम होत नसल्याने या दोन्ही जिराफांचे डोळे इतर जिराफांसारखेच आहेत.