वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी देखील पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचं निवास स्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये देखील कोरोना पोहोचला आहे. व्हाईट हाऊसमधील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. पीटीआयच्या माहितीनुसार अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक् माईक पेनेस यांच्यासोबत असलेल्या एका अधिकाऱ्याला कोरोना झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आता हा अधिकारी व्हाईट हाऊसमध्ये कोणकोणाला भेटला याची माहिती काढली जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेनेस हे गेल्या अनेक दिवसांपासून या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेले नाहीत.


उपराष्ट्राध्यक्षांचे प्रेस सचिव कॅटी मिलर यांनी माहिती दिली की, आज आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, उपराष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील एक अधिकारी पॉझिटिव्ह सापडला आहे. आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्सनुसार आता या अधिकाऱ्याच्या संपर्कात कोण-कोण आलं याची माहिती घेतली जात आहे. अमेरिकेत आतापर्यंत 230 लोकांचा मृत्यू झाला आहे.


व्हाईट हाऊसने आजुबाजुच्या परिसरात आता प्रवेशासाठी गाईडलाईन्स जारी केले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या डॉक्टरांची टीम येथे सतत तापमानाचं निरीक्षण करत आहेत.


व्हाईट हाऊसने मिटींग रुममध्ये 2 खुर्च्यांमधील अंतर देखील वाढवलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार अमेरिकेत शुक्रवारपर्यंत कोरोनामुळे 230 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 18 हजार रुग्ण आढळले आहेत. 50 तासात 10 हजार लोकांना कोरोना झाला आहे.