मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हैराण झालं आहे. या जागतिक साथीच्या रोगाने संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे. असं असताना WHO ने चीनला मोठा झटका दिला आहे. जगभरात कोरोना व्हायरस पसरण्यास चीनमधील वुहान मार्केट जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO चे फूड सेफ्टी जूनॉटिक व्हायरस एक्सपर्ट डॉ. पीटर बेन ऐंबरेक यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला. वुहानच्या वेट मार्केटने कोरोना जगभर पसरवण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. 


महत्वाचं म्हणजे या शहरातून व्हायरस बाहेर गेला की बाहेरून व्हायरस या शहरात आला हा संशोधनाचा विषय आहे. पण आता प्रश्न असा उपस्थित राहतोय की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणात वुहान शहर किती जबाबदार आहे. 


पीटर यांनी अमेरिकेकडून चीनवर करण्यात येणाऱ्या आरोपावर काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी म्हटलं की मर्सचा सोर्स ऊंट आहे हे जाणून घेण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. कोरोना येऊन अधिक काळ गेलेला नाही. आता आपल्याकडे सर्वात मोठी जबाबदारी आहे की, आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू. मर्स हा व्हायरस २०१२ मध्ये सौदी अरब येथे निर्माण झाला होता. मिडिल ईस्ट देशात याचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला होता.  


चीनकडे सर्व साधन आहेत. तसेच त्यांनी अनेक योग्य रिसर्च देखील केले आहे. मात्र अशावेळी इतर देशांशी सलोख्याचे संबंध निर्माण करण अत्यंत गरजेचं आहे. त्यात महत्वाचा मुद्दा असा की, अनेक अनुभव इतरांसोबत व्यक्त करायला हवेत.