कोण होता `भटकती आत्मा`? ज्याने भल्या-भल्या सरदारांना बरबाद केले!
Who is Bhatakti Atma: . भटकती आत्माला इंग्रजीमध्ये वंडरिंग स्पिरीट असे म्हणतात. या वॅंडरिंग स्पिरीटची कहाणी फार कमी जणांना माहिती असेल.
Who is Bhatakti Atma: 'भटकती आत्मा' हा शब्द सध्या देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तसेच या शब्दाला काही ऐतिहासिक संदर्भदेखील आहेत. आपण या शब्दाचा मागोवा घेतला तर ई.पूर्व 1845 ते 1885 या काळात आपल्याला हा शब्द नेतो. भटकती आत्माला इंग्रजीमध्ये वॅंडरिंग स्पिरीट असे म्हणतात. या वॅंडरिंग स्पिरीटची कहाणी फार कमी जणांना माहिती असेल. कोण होती ही व्यक्ती? काय आहे हा प्रसंग जाणून घेऊया.
वॅंडरिंग स्पिरीट हा 'प्लेन्स क्री'चा तरुण युद्ध प्रमुख होता. तो नेहमी एका टोळीचे प्रमुख असलेल्या बिग बियर यांच्याविरोधात युद्ध, संघर्ष करायचा. जेव्हा काही काळासाठी बिग बियर हे आपली टोळी सोडून दुसऱ्या कामासाठी जायचे तेव्हा त्यांचा मुलगा इमासीस हा बॅंडचे नेतृत्व करत असे. यावेळी वॅंडरिंग स्पिरीट संधीचा फायदा घ्यायचा आणि बिग बियरच्या टोळीला पुन्हा आव्हान द्यायचा. वॅंडरिंग स्पिरिट हा युद्धनीतीचे अजिबात पालन करायचा नाही. तो कधीही विरोधी सैन्यावर हल्ला करायचा. असे असूनही तो यात सारखा अयशस्वी ठरायचा. यामुळे त्याची लोकप्रियता खूप कमी झाली.
1885 साली झालेला फ्रॉग हिंसाचार झाला होता. वॅंडरिंग स्पिरीट हा फ्रॉग लेक हिंसाचारातील कुख्यात युद्धनितीसाठी ओळखला जातो. आपल्या जीवनकाळात त्याने ब्लॅकफूट योद्ध्यांवर अनेक हल्ले केले आणि त्यांना मारण्यात तो यशस्वी ठरला. यानंतर वॅंडरिंग स्पिरीट याला कॅनडाच्या न्याय व्यवस्थेने दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली.
का झाला 'फ्रॉग लेक' हिंसाचार?
उपासमारी, परिस्थिती परिवर्तन, राजकीय आणि सासंकृतिक संघर्षासाठी फ्रॉग लेक नरसंहार झाला. 1880 च्या दशकात 'प्लेन्स क्री' हे म्हशींची संख्या कमी झाल्याने त्रस्त होते. त्यांची उपजिविका म्हैशींवर होती. शिकारीच्या बदलत्या पद्धतीने पूर्ण कॅनडामध्ये म्हैस दुर्लभ होत चालल्या होत्या. यामुळे प्लेन्स क्री आणि मेटिस यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले.
वॅंडरिंग स्पिरिटच्या नेतृत्वातले प्लेन्स क्री हे शिकारीच्या नियमांचे उल्लंघन करत होते. तसेच म्हशींच्या शोधासाठी ब्लॅकफूट जमिनीवर अतिक्रमण करत होते. म्हैशींची संख्या कमी झाल्याने स्वदेशी समूह सरकारी रेशनवर अवलंबून असायचे. ज्याचे नियोजन भारतीय एजंट करायचे. त्याकाळी अपुरे आणि खराब रेशन हा वादाचा मुद्दा बनत चालला होता. भूखमारी आणि राजनीती हे मूळ निवासी आणि युरोपीय व्यापाऱ्यांमधील तणावाचे प्रमुख कारण होते. ब्लॅकफूटसोबत कॅनडा सरकारची प्रदीर्घ लढाई झाली. यानंतर कॅनडा सरकारने प्लनेस् क्री ला फ्रॉग लेकमध्ये स्थलांतरित केले. येथे आधीच बिग बियरची टोळी राहत होती. त्यांना तेथे सरकारी सहायता मिळत होती. ज्यांच्याशी वॅंडरिंग स्पिरीट हा संघर्ष करायचा.
यानंतर वॅंडरिंग स्पिरीटचा प्लेन्स क्री गट वारंवार हिंसाचार करत असे. पुर्वी सांगितल्याप्रमाणे ते युद्धनितीचे पालन करीत नसतं. क्री हे केवळ भूखमारीविरोधात आपली प्रतिक्रिया देत असल्याची प्रतिक्रिया वंडरिंग स्पिरीट याने दिली. अनेक महिन्याच्या संघर्षानंतर वॅंडरिंग स्पिरीटला घेरण्यात आले. त्याने आत्मसमर्पण केले. स्वत:च्या छातीत सुरा खुपसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ताब्यात घेण्यात आले. वॅंडरिंग स्पिरीट म्हणजेच 'भटकती आत्मा'च्या खूप कहाण्या सांगितल्या जातात. पण खरी कहाणी कोणती? हे कधी समोर आले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भटकती आत्मा म्हणून आपल्या विरोधीपक्षाच्या नेत्यावर हल्लाबोल केला. त्यांचा हा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असल्याचेही म्हटले जात आहे. त्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भटकती आत्मा हा शब्द चर्चेत आहे. परंतु, याचा भटकती आत्मा या व्यक्तीशी काहीच संबंध नाही.