Knowledge News in Marathi : आजकाल मोबाईलचा (Mobile)  सर्वजण वापर करतात. मात्र जेव्हा आपण एखाद्याला कॉल (calling) करतो किंवा कोणीतरी आपल्याला कॉल करतो तेव्हा आपण पाहतो की मोबाइल नंबरच्या (contact number) सुरूवातीला +91 आहे. तुम्ही कधीही विचार केला आहे का की कोणत्याही फोन नंबरच्या (phone number) आधी +91 का लिहिले जाते? कारण हा देश कोड (country code) आहे आणि भारताचा देश (Indian Code) कोड +91 आहे. पण फक्त +91 का? इतर देशाचा कोड का दिला नाही. त्याचबरोबर भारताला हा कंट्री कोड कोणी दिला आणि कोणत्या आधारावर हे ठरवले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच कंट्री कॉलिंग (calling ) कोड कसे ठरवले जातात आणि ते कोण ठरवते? इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (International Telecommunication Union) म्हणजे काय? इंटरनॅशनल डायरेक्ट डायलिंग (International direct dialing) म्हणजे काय? चला तर मग या सर्वांची माहिती सविस्तर जाणून घेऊया.


इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणजे काय?


देश कॉलिंग कोड किंवा देश डायल-इन कोड टेलिफोन नंबरच्या  प्रीफिक्स वापरले जातात. याच्या मदतीने इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) चे सदस्य किंवा या प्रदेशातील टेलिफोन ग्राहक जोडले जाऊ शकतात.


उदाहरणार्थ, भारतासाठी हा कोड +91 आहे. तर पाकिस्तानचा डायल कोड +92 आहे. या कोडना आंतरराष्ट्रीय सदस्य डायलिंग असेही म्हणतात. ITU म्हणजेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ही एक विशेष एजन्सी आहे. जी संयुक्त राष्ट्रांचा भाग आहे.


ही एजन्सी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांवर काम करते. 17 मे 1865 रोजी आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ युनियन म्हणून त्याची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. एकूण 193 देश या संघाचा भाग आहेत. देशाचा कोड देणे हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. म्हणजेच या एजन्सीने भारताला +91 कोड दिला आहे.


वाचा : Petrol Diesel; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव  


भारताला +91 कोड का आला?


देश कोड आंतरराष्ट्रीय टेलिफोन नंबरिंग योजनेचा भाग आहेत. ते एका देशातून दुसऱ्या देशात कॉल करताना वापरले जातात. तुमच्या देशात हा कोड आपोआप लागू होतो. परंतु आंतरराष्ट्रीय नंबर डायल करण्यासाठी तुम्हाला हा कोड वापरावा लागेल.


म्हणजेच, जेव्हा तुम्ही तुमच्याच देशातील दुसऱ्या स्थानिक वापरकर्त्याला कॉल करता तेव्हा हा कोड आपोआप लागू होतो. पण इंटरनेट कॉलमध्ये तुम्हाला हा कोड वेगळा वापरावा लागेल.


कोणत्या देशाला कोणता कोड मिळेल. हे त्यांच्या झोन आणि झोनमधील त्यांची संख्या यांच्या आधारे ठरवले जाते. भारत हा 9व्या झोनचा भाग आहे. ज्यामध्ये मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातील देशांचा समावेश आहे. येथे भारताला 1 कोड मिळाला आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय डायलिंग कोड +91 आहे. तर तुर्कीचा कोड +90, पाकिस्तानचा +92, अफगाणिस्तानचा +93, श्रीलंकेचा +94 आहे.