चिमुकलीनं पहिला श्वास घेतला आणि आईनं शेवटचा....वर्षभरानंतर कुठल्या वळणावर येऊन थांबलं आयुष्य
एकाच जागी झालं पत्नीचं अखेरचं आणि मुलीचं पहिलं Photoshoot... नियतीचा क्रूर खेळ
नवी दिल्ली: बऱ्याचदा आकर्ष आणि प्रेम यामध्ये गल्लत केली जाते. खरं प्रेम काय असतं आणि ते कसं जपलं जातं हे सांगणारा एक फोटो सध्या खूप चर्चेत आहे. या फोटोमागची कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. एवढंच नाही तर खरं प्रेम काय असतं आणि असं प्रेम करणारी व्यक्ती कायम आपल्या आयुष्यात असावी असं प्रत्येकाला वाटू लागेल.
एका व्यक्तीनं आपल्या आपल्या पत्नीला गमवालं पण तिने दिलेल्या गोंडस मुलीला मोठ्या हिमतीनं जपलं वाढवलं. पत्नी गेली मात्र तिच्या आठवणी मनात ताज्या होत्याच. पण त्या पुन्हा मुलीसोबत जगता याव्यात यासाठी त्याने चक्क या कपलनं बेबी शॉवरचं फोटोशूट ज्या ठिकाणी आणि जसं केलं तसंच त्याच पोझ पुन्हा देऊन फोटोशूट केलं आहे.
चिमुकली आणि वडिलांचं हे खास फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे. या फोटोशूटमागची कहाणी तितकीच मन सुन्न करणारी भावुक करणारी आहे. या व्यक्तीचं नाव आहे जेम्स. जेम्स आणि त्याची पत्नी खूप खूश होते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे बेबी शॉवरचं फोटोशूट सुरू होतं.
पुढे काही दिवसांनी त्यांच्या घराबाहेर चालत जात असताना जेम्स यांच्या पत्नीला एका कारने धडक दिली. या दरम्यान त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये त्यांचं बाळ वाचलं मात्र त्यांनी पत्नीला गमवलं. चिमुकली आल्याचा आनंद साजरा करावा की प्रिय बायको गेल्यातून सावरावं या द्विधा मनस्थितीत जेम्स होते.
जेम्स यांनी मोठ्या हिमतीनं या चिमुकलीचा सांभाळ केला. तिच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी पत्नीसोबत ज्या ठिकाणी फोटोशूट केलं तिथेच त्याच पोझ देऊन फोटोशूट केलं. त्याचं हे अनोखं फोटोशूट खूप चर्चेत आलं आहे.
कॅप्शनमध्ये जेम्स म्हणाले की, 'आज माझ्या पत्नीला जाऊन एक वर्ष झालं आणि आज माझी मुलगी अॅडलीनचा वाढदिवस... तिच्या आईने तिच्या मॅटर्निटी शूटसाठी घातलेल्या गुलाबी रंगाच्या ड्रेस सारखेच आम्ही अॅडलीनला फ्रॉक घातला. शूटचे लोकेशनही तेच ठेवलं आहे. हे एक वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं. पण एक चांगला बाबा होण्यासाठी मी माझ्या परीने नक्की प्रयत्न केला. जर माझी बायको आज असती तर तिला खूप आनंद झाला असता.
ही भावनिक पोस्ट वाचल्यानंतर लोकांचे डोळे पाणावले आहेत. जेम्स यांनी आपली स्टोरी इन्स्टावर फोटोसह शेअर केली. यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला खूप मिस केलं. आपली पत्नी आपल्यासोबत आहे असं समजून त्यांनी मुलीसोबत फोटोशूट केलं आहे. त्यांनी दिलेलं फोटोवरील कॅप्शन भावुक करणारं आहे.