मुंबई : सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याचं राज्य संपूर्ण जंगलावरती असतं. सिंहाने एखाद्याची शिकार करायची ठरवली तर तो प्राणी शिकार होणारच. सिंहाचा वार सहसा कधी वाया जात नाही. म्हणून कोणीही सिंहाशी पंगा घेत नाही. त्याच्या तावडीच एखादा शिकार आला की, तो गेलाच म्हणून समजा. परंतु सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो हे सगळं खोट असल्याचे स्पष्ट होतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कसं अन्य प्राण्यांनी सिंहाच्या तावडीतून पळ काढला. एवढंच काय तर अनेकांनी त्याला उचलून उचलून, तर कधी पायानी तुडवलं आहे. ज्यामुळे हे सिद्ध होत आहे की, जंगलाच्या राज्याचा देखील कोणी प्रतिकार करु शकतं आणि त्याच्या तावडीतून आपली सुटका करु शकतं.


युट्यूबच्या किंग ऑफ बीस्ट्स या वाईल्ड लाईफ चॅनेलवर असाच एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही असे वेगवेगळे प्रसंग पाहू शकता. जेव्हा शिकार करण्यासाठी गेलेला सिंहाला स्वत:चे प्राण वाचवणे कठीण होऊन बसते.


जंगलात प्राण्यांचा संघर्ष ही नवीन गोष्ट नाही. पण अशा संघर्षांमध्ये सिंहाचा विजय आणि बाकी प्राण्यांचा पराभव असे अनेकदा दिसून येते. पण किंग्स ऑफ बीस्ट्स या वन्यजीव चॅनलचा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर, तुमच्या लक्षात येईल की, एकदा दोनदा नाही, तर अनेक वेळा सिंहाला आपले प्राण वाचवणे कठीण झाले आहे.



या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बैल आपल्या शिंगांणी सिंहाला उडवून लावतो, तसेच त्याला बऱ्याच वेदनाही देतो.


दुसरीकडे, दुसऱ्या क्लिपमध्ये, सिंहाला म्हशी आपल्या पायाखाली तुडवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ फारच धक्कादायक आहे.


सिंहाला त्याच्या कृत्याची शिक्षा वेळोवेळी मिळते. त्यालाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्यातून हा संदेश मिळतो की कोणी कितीही बलवान असला तरी कधी-कधी कमकुवत सुद्धा बलवानाचा पराभव करू शकतो.