नेपिताव : म्यानमारच्या संसदेनं गुरुवारी विन मिंत यांची देशाचे नवे राष्ट्रापती म्हणून निवड केलीय. विन मिंत म्यानमारच्या प्रतिष्ठित नेत्या आंग सान सू की यांच्या जवळचे मानले जातात. सोबतच विन मिंत देशातील शीर्ष स्तरीय नीति-निर्धारण प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी राष्ट्रपती हितन क्याव हे आपल्याला आरामाची गरज असल्याचं सांगत गेल्या आठवड्यात अचानक पदावरून बाजुला झाले होते. यानंतर ६६ वर्षीय विन मिंत यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आलीय. 


सेनेद्वारे तयार करण्यात आलेल्या संविधानातील अटींमुळे राष्ट्रपती पदासाठी सू यांची निवड होऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे त्यांनी एका परदेशी व्यक्तीशी विवाह केलाय... आणि त्यांची दोन्हीही मुलं ब्रिटनचे नागरिक आहेत. २०१५ मध्ये आपल्या पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्या स्टेट काऊंसलर पदावर आहेत आणि राष्ट्रपतींच्या वरती काम करत राहणार, अशी घोषणाही त्यांनी केली होती. 


विन मिंत यांनी खालच्या सदनाच्या स्पीकर पदाचा २२ मार्च रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर मिंत राष्ट्रपतीपदी विराजमान होऊ शकतात, अशी चाहूल लागली होती. 


उल्लेखनीय म्हणजे, म्यानमार सेनेसोबत सत्तेसाठी हातमिळवणी करत सरकार शासन करत आहे. वर्तमान व्यवस्थेत सेनेकडे अनेक राजनैतिक आणि आर्थिक अधिकार आहेत. इतकंच नाही तर देशातील संसदेत एक चतुर्थांश जागा सेनेसाठी आरक्षित आहेत.