Wisdom Sparrow Age 74 Years Old : प्रजनन ही प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. प्रत्येक सजीवाच्या वयाच्या ठराविक टप्प्यानंतर प्रजनन क्षमता कमी बंद होतो. मात्र, एका पक्ष्याने वयाच्या 74 व्या अंडी दिला आहेत. यामुळे जगभरातील संशोधक अचंबित झाले आहेत. ही पक्षी म्हणजे जगातील एक दुर्मीळ आणि वयोवृद्ध पक्षी ठरला आहे.


हे देखील वाचा... लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल होण्यामागची कारणे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती आहेत. वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांचे आयुर्मान वेगवेगळे असते. काही पक्षांचे आयुष्य  2 ते 5 वर्षे असते. तर,  काही पक्षी 60-70 वर्षे जगतात. विजडम हा सर्वात जास्त वर्ष जिवंत राहणारा पक्षी आहे.  वयाच्या 74 व्या वर्षी अंडी देणारा हा पक्षी चांगलाच चर्चेत आवा. हा पक्षी चिमणीची दुर्मिळ प्रजाती आहे. 


वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणारा हा पक्षी सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर USFWS Pacific नावाच्या अकाऊंटवरुन  या पक्षाचा जोडीदारासोबतचा शेअर करण्यात आला आहे. हवाई जवळ पॅसिफिक महासागरातील मिडवे ॲटोल नॅशनल वाइल्डलाइफ रिफ्युजमध्ये हा पक्षी जोडीदाराशी जवळिक साधताना कॅमेऱ्यात कॅप्चर झाला.   यानंतर या पक्षाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. 1956 मध्ये हा पक्षी सर्वप्रथम आढळून आला. यावेळी त्याला टॅग करण्यात आले. Z333 अशा विशिष्ट टॅगने हा पक्षी ओळखला जातो.  



लेसन अल्बट्रॉस प्रजातीचा हा विजडम पक्षी 68 वर्षांपूर्वी म्हणजेच 1956 मध्ये प्रथम ओळखला गेला होता. त्यावेळी या पक्ष्याचे अंदाजे वय 5 वर्षे होते. हा पक्षी 1951 मध्ये जन्माला आला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने 1956 मध्ये लेसन अल्बट्रॉस प्रजाती विडजॅमला टॅग केले तेव्हा त्याला Z333 हा टॅग देण्यात आला. हा टॅग आजही या पक्षाची ओळख आहे. विस्डमचे वय पाहून संशोधकही आश्चर्यचकित झाले आहेत. लेसन अल्बट्रॉस प्रजातीमधील बहुतेक पक्षी त्यांच्या आयुष्याचा 90% भाग आकाशात उडण्यात घालवतात. यामुळे या पक्षाचे अधिक संशोधक करणे संशोधकांना शक्य होत नाही.