इस्लामाबाद : Pakistan Political Crisis :पाकिस्‍तान संसदेमधील अविश्‍वास प्रस्‍ताव फेटाळल्‍यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्‍ट्रपतींना संसद ( Pakistan Assembly ) बरखास्‍त करण्‍याची शिफारस केली. त्‍यानुसार राष्‍ट्रपतींनी पाकिस्‍तान संसद बरखास्‍त करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुढील 90 दिवसांमध्‍ये निवडणुका घेण्‍यात येणार आहेत.


इम्रान खान यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अंतरिम सरकारच्या स्थापनेसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. थोड्याच वेळात पाकिस्तानी लष्कर पत्रकार परिषद घेणार आहे. राष्ट्रपतींनी शिफारस मंजूर केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत. संसदेतील उपसभापतींनी इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला. विधानसभा अध्यक्षांनी 25 एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.


'राष्ट्रपतींनी सभागृह विसर्जित करावे'



पंतप्रधान इम्रान खान यांनी सभागृह बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली असल्याचे सांगितले. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


मरियमने इम्रानला वेड्यात काढलं


दरम्यान, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर मरियम नवाज यांनी ट्विट करत पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. आपली खुर्ची वाचवण्यासाठी कोणालाही पाकिस्तानच्या संविधानाशी खेळू देऊ नये, असे ते म्हणाले. त्यानी इम्रान खान यांना वेडा म्हटले आहे. या गुन्ह्यासाठी इम्रानला शिक्षा झाली नाही, तर आजपासून देशात जंगलराज लागेल, असे ते म्हणाले. 


इम्रान खान दुसऱ्यांदा देशाला संबोधित करणार 


अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान देशाला संबोधित करणार आहेत. दोन दिवसांत ते दुसऱ्यांदा पाकिस्तानी जनतेला संबोधित करणार आहेत. 


इम्रानविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला


दरम्यान, पाकिस्तानी संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. स्पीकर यांनी हा अविश्वास ठराव फेटाळला आहे. त्यानंतर संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.