पेईचींग : भारताचे शेजारी राष्ट्रपती चीन आज (रविवार, ११ फेब्रुवारी) आज मोठ्या स्थित्यांतरनाला सामोरे जात आहे. चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांचा आजीवन राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. जीनपिंग यांचा कार्यकाळ पू्र्ण होताच त्यांना आजीवनकाळ राषट्रपतीपदाचा अधिकार प्राप्त आहे.


सीपीसीने दिली मंजूरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील सत्तारूढ कम्युनिश्ट पार्टी ऑफ चयना (सीपीसी) कडून जीनपींग यांना असे पद आणि अधिकार देण्याबाबत जवळपास शिकामोर्तब झाले आहे. त्याबाबतची औपचारीक घोषणा केवळ बाकी असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाच्या या प्रस्तवाचे समर्थन करणाऱ्या तीन हजार सदस्यांच्या संसदेला नॅशनल पीपल्स क्राँग्रेस म्हटले जाते. ही काँग्रेस केवळ रबर स्टॅंम्प असल्याचेही बोलले जाते. या काँग्रेसच्या वार्षीक अधिवेशनाच्या आगोदरच सीपीसीने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना घालून देण्यात आलेली दोन वेळा नेतृत्व करण्याची समयसीमा हटविण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला.


६४ वर्षीय शी होणार चीनचे सर्वात शक्तीमान नेते


माओत्से तुंग यांच्याप्रमाणे कोणा एकाकडेच अधिक काळ सत्ता देण्याचा धोका लक्षात घेऊन चीनचे लोकप्रिय नेते डेंग शियापिंग यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना पदावर राहण्याबाबतची समयसीमा निश्चित केली होती. त्यानुसार कोणत्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीला केवळ दोन वेळाच या पदावर राहता येते. हा काळ जास्तत जास्त १० वर्षांचा असतो. मात्र, पक्षाच्या घटनात्मक बदलानुसार ६४ वर्षीय शी यांना आजीवन राष्ट्रपतीपद बहाल करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. जीनपिंग यांचा सध्या दुसरा कार्यकाळ सुरू आहे. जो २०२३ मध्ये संपत आहे.