नवी दिल्ली : महिलांवरील हिंसाचाराच्या घटना भारतातच नाही विदेशातही घडतांना दिसत आहे. तुर्कस्तानमधून अशीच एक घटना समोर आली आहे. रमजानच्या महिन्यात एका तरुणीने शॉर्ट स्कर्ट घातल्याने तिच्यावर हल्ला केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका विद्यापीठाची ही विद्यार्थिनी आहे. जी इस्तांबूलमध्ये बसमधून प्रवास करत होते. एका व्यक्तीने प्रवास दरम्यान तिच्या चेहऱ्यावर मागून हल्ला केला. तरुणीने सांगितलं की, त्याआधी तो तिला सारखं म्हणत होता की रमजानच्या महिन्यात स्कर्ट घालणं अपराध आहे.


एका स्टॅंडवर बसमधून उतरतांना त्याने अचानक त्या तरुणीवर हल्ला केला. त्यानंतर तो तिला सारखं ओरडून सांगत होता की पुन्हा असे कपडे घालू नको. चौकशी दरम्यान आरोपीने हे मान्य केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं.