लंडन : लोकांना रोमांच अनुभवायला आवडतो. यासाठी ते लोकं स्वत:च्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. थरार अनुभवायला लोकं जास्त पैसे देखील द्यायला तयार होतात. परंतु कधी कधी अशा गोष्टी लोकंना भारी पडतात आणि त्याची किंमत लोकंना स्व:ताचा जीव देऊन मोजावी लागते. अशीच एक घटना अमेरिकेत घडली. येथे रोलर कोस्टर राइड एका महिलेसाठी प्राणघातक ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला या महिलेचे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते, परंतु पोस्टमार्टम रिपोर्टमूळे संपूर्ण घटना समजली. अहवालात असे सांगितले गेले आहे की, अत्यधिक प्रेशरमुळे या महिलेची धमनी (Artery) फुटली होती आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला. रक्तस्त्राव शरीराच्या आत झाल्याने बाहेरुन तिला काय झाले हे समजले नाही.


एका मीडिया अहवालानुसार, 47 वर्षीय Dawn Jankovic गेल्या महिन्यात आपल्या मुलासह अमेरिकेच्या इंडियाना येथील हॉलिडे वर्ल्ड आणि स्प्लॅशिन सफारी पार्कमध्ये गेली होती. येथे तिने रोलर कोस्टर राइड देखील घेतली. या दरम्यान अचानक तिची तब्येत खराब झाली आणि ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.


जानकोविचच्या मृत्यूमागील कारणांबद्दल सुरुवातीला अनेक अंदाज बांधले जात होते. पण बुधवारी पोस्टमार्टम रिपोर्टमधून हे स्पष्ट झाले की, ही राइडमुळेच तिचा मृत्यू झाला आहे.


या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, राइड दरम्यान जास्त फोर्समुळे Dawn Jankovicला अंतर्गत रक्तस्त्राव झाला. कारण तिच्या शरीरातील धमनी फुटली होती. या घटनेनंतर सफारी पार्कने आपली रोलर कोस्टर राइड काही दिवस बंद केली होती.


पार्कमधून असे सांगितले गेले आहे की, खबरदारी म्हणून खबरदारी म्हणून रोलर कोस्टरची तपासणी केली गेली आहे आणि सर्व काही ठीक आहे. परंतु हे देखील तेवढेच खरे आहे की, या घटने नंतर लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.



Dawn Jankovicच्या 17 वर्षाच्या मुलाने सांगितले की, अपघाताच्या दिवशी Dawn  पूर्णपणे ठीक होती. तिला कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. मुलगा म्हणाला, "मी आणि माझी आई बऱ्याचदा उद्यानात जायचो. रोलर कोस्टर राइड ही आमची आवडती राईड होती."


हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यापूर्वीही रोलर कोस्टर राइडबद्दल अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत. कधीकधी लोकं उत्साहाने सवारीसाठी तयार होतात, परंतु नंतर त्यांना आपला जीव देऊन याची किंमत मोजावी लागते.