Woman Takes Off Clothes In Plane: विमान हजारो फूटांवर असतानाच तिने सर्वांसमोर कपडे काढले अन्...
woman takes off her clothes in the plane: ही महिला आधी टॉयलेटकडे चालत गेली आणि तिने धुम्रपान करण्याचा प्रयत्न केला असता तिला रोखण्यात आलं अन् गोंधळ सुरु झाला.
Woman Takes Off Clothes In Plane: रशियामधील (Russia) एका विमान उड्डाणदरम्यान विमान हजारो फूट उंचीवर असताना एका महिला प्रवाशाने अंगावरील सर्व कपडे काढून गोंधळ घातला. अंगावरील कपडे काढून ही महिला विमानात सैरवैर पळू लागली. तसेच ती विमानत धुम्रपानही करु लागली. या महिलेनं कॉकपिटमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. तसेच या महिलेने ओरडून विमानातील प्रवाशांना तुम्ही सर्व मरणार आहात असंही सांगितलं. यानंतर कॅबिन क्रूने या महिलेला कॉकपिटमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं.
नक्की कुठे घडला हा प्रकार?
ही घटना स्टावरोपोलहून मॉस्कोला जाणाऱ्या 'एअरोफ्लोट एअरलाइन्स'च्या (Aeroflot Airlines) विमानामध्ये घडली. 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार अँजेलिका मोस्कविटिना असं या महिलेचं नाव आहे. अँजेलिका आपल्या सीटवरुन उठून धुम्रपान करण्यासाठी टॉयलेटच्या दिशेने चालू लागली. मात्र तिला विमानामध्ये धुम्रपान करता येणार नाही असं सांगितलं. यावरुन तिने वाद घालण्यास सुरुवात केली. काहीवेळ वाद घातल्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांसमोर या महिलेनं स्वत:च्या अंगावरील सर्व कपडे काढले आणि नग्नावस्थेत उभी राहिली. "मला मारुन टाकलं तरी हरकत नाही पण मी धुम्रपान करणारच," असं ही महिला कॅबीन क्रूला सांगत होती.
व्हिडीओत काय दिसतं?
'डेली मेल'ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विमानातील प्रवाशांपैकी एकाने या महिलेला, "तुम्ही जे करत आहात ते विमानातील वागणुकीसंदर्भातील नियमांचं उल्लंघन करणारं आहे हे जाणता का? इथे लहान मुलं आहेत किमान त्यांचा तरी विचार करा," असं म्हटलं. कॉकपीटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असलेल्या अँजेलिकाने मागे वळून या प्रवाशाला उत्तर देताना, "मला समजतंय की मला मेंटल हॉस्पीटल किंवा तुरुंगात जावं लागू शकतं. मात्र मला एकदा विमानाच्या पायलेटला पाहण्याची इच्छा आहे," असं म्हटलं. या महिलेला एका मुख्य फ्लाइट अटेंडन्टने रोखलं, अशी माहिती या एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी दिली.
कंपनीने काय सांगितलं?
'एअरोफ्लोट एअरलाइन्स'च्या प्रवक्त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. "महिला प्रवाशाने केलेल्या या कृत्यानंतर वैमानिकाने संयम कायम ठेवला. या प्रकरणावरुन सर्व एअरलाइन्ससाठी एक महत्त्वाचा संदेश मिळतो तो म्हणजे अशा प्रवाशांना ब्लॅक लिस्ट तयार करावी. अशा लोकांना कठोर शिक्षा केली पाहिजे," अशी मागणी 'एअरोफ्लोट एअरलाइन्स'ने केली आहे.
महिला पोलिसांच्या ताब्यात
हे विमान मॉस्कोमध्ये उतरल्यानंतर शेरेमेतियोवो विमानतळावर या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर तिची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असून महिलेची चौकशी सुरु आहे. या महिलेला काही मानसिक आजार आहे का तिने असं कृत्य का केलं यासंदर्भातील तपास केला जाणार आहे.